SBI ची ग्राहकांना चेतावणी! मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप असेल तर खाली होऊ शकते संपुर्ण खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रकार वाढतच आहेत. हे लक्षात घेता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांसाठी नुकताच अलर्ट जारी केला आहे. एका ट्विटद्वारे एसबीआयने लोकांना कोणतेही अनधिकृत मोबाईल अ‍ॅप वापरू नका असा सल्ला दिला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की, असे मोबाइल अ‍ॅप्स फसवणूक करणार्‍यांना … Read more

कराड तालुक्यात १८ कोरोना मुक्त रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |  कराडच्या कृष्णा हास्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. शेणोली स्टेशन येथील 7, म्हासोली येथील 3, वानरवाडी येथील 3, करपेवाडी, तामिनी-पाटण, साकुर्डी, सदुर्पेवाडी आणि गलमेवाडी येथील प्रत्येकी अशा एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. याच्याबरोबर आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 162 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. … Read more

पुण्यातील भुशी डॅमसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंदच राहणार – जिल्हाधिकारी 

पुणे । राज्यात आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. संचारबंदीचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या सर्व परिस्थितीमुळे पर्यटन स्थळांना भेटी द्यायचे नियोजन केले असेल. सामाजिक अलगाव राखत जिल्ह्यातील डॅमना भेटी द्यायचे नागरिकांचे नियोजन यावेळी होऊ शकणार नाही. कारण तसे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याच … Read more

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत. आजपासून … Read more

धक्कादायक! हर्सूल कारागृहात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे 29 रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे. आज सकाळी 90 जणांचे … Read more

WHO ने जाहीर केले मास्क घालण्याचे नवे निर्देश; ‘हे’ तुम्हाला माहिती असणे महत्वाचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने आता मास्क घालण्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांनी मास्क घालावे. या नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये फेस मास्क कोणी घालावा तसेच कोणत्या परिस्थितीत घालावा आणि … Read more

मुंबईहून अचलपुरला गावी परतलेल्या २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई | अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या व काकडा गावात मुंबईहून दिनांक २६ मे रोजी आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. विशेष म्हणजे या युवकामधे कोणतेही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र तरीही याचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना सकारात्मक आल्याने आता चींता व्यक्त होत आहे. … Read more

खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल सुरु पण ‘या’ सूचनांचे पालन करावेच लागेल

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी कामकाजाबाबत एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गर्भवती महिला, 65 वर्षांवरील लोक आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत अशा लोकांनी कामावर जाणे टाळले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. सोबतच कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, सफाई, सॅनिटायझेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये थुंकण्यावर पूर्णपणे बंदी … Read more

कोरोनाव्हायरसच्या आपल्या अनुभवाबद्दल प्रिन्स चार्ल्स म्हणाले-”हिंमत हरु नका,लढा द्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गाला आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटी देखील बळी पडलेले आहेत. अशा सेलिब्रेटींपैकी एक असलेले ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. लंडन मध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात … Read more

दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच नागरिकांना येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ८ जूनपासून बहुतांश राज्यातील मंदिरे नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र नागरिकांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक … Read more