सोलापूरच्या महापौरांना कोरोनाची लागण 

सोलापूर । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता सोलापूरच्या महापौर आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. या दोघा पती पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी ४० रुग्ण वाढले आहेत. अशातच या पती पत्नींना कोरोनाची लागण … Read more

सोलापूरचे उपमहापौर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलिसांनी काल सोलापुरातून अटक केली आहे. फ्लॅट खरेदी-विक्रीमध्ये सुमारे 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोलापूरमधील विजापूरनाका पोलीस ठाण्याच्या मदतीने काळे यांना घरातून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कोंडवा येथील सिंधू सुभाष चव्हाण यांच्या मुलाने 15 … Read more

सोलापूरात दिवसभरात ४९ नवे कोरोनाग्रस्त; ६ जणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे काल मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. … Read more

सोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा … Read more

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी … Read more

दिलासादायक ! सोलापूरात अवघ्या 22 दिवसाच्या बाळाने केली कोरोनावर मात

सोलापूर प्रतिनिधी l कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सोलापुरातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात … Read more

सोलापुरात एकाच दिवशी आढळले 48 कोरोना बाधित, एकूण संख्या 264

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता मोहोळ तालुक्यात प्रवेश केला आहे. मोहोळ तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पेनुर येथे आढळल्यानंतर आज ढोक बाभुळगाव, सावळेश्वर आणि पाटकूल येथे नवीन कोरोना बाधित रुग्ण आज आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात आज एका दिवशी 48 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सोलापुरातील एकूण रुग्ण संख्या 264 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी … Read more

सोलापूरात आत्तापर्यंत 16 पोलिसांना कोरोना; बंदोबस्तावर असलेल्या तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलिस कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कातील 68 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 48 जणांना विलगीकरण कक्षात तर वीस जणांना होम क्वारंनटाइन करण्यात आले होते. त्यापैकी नऊ जणांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले असून त्याची तपासणी खाजगी लॅब मधून करण्यात आली आहे. आता या नऊ जणांच्या संपर्कातील पोलीस … Read more

पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे. लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी … Read more

सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा २१६ वर, आज वाढले 20 रुग्ण

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज 20 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 216 झाली आहे. आज अशोक चौक परिसरातील 48 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 14 झाली असून रुग्णालयात 173 जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोना … Read more