राजू शेट्टींनी व्यक्त केली राज्याचे कृषीमंत्री होण्याची इच्छा, मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळेल का?

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सह पक्षांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत.

पांडुरंगा समक्ष घडली ‘फेसबुक’ बहीण-भावाची अविस्मरणीय भेट!

आजकाल तरुण पिढी फेसबुकच्या आभासी दुनियेच्या माध्यमातून मैत्रीची नवी नाती जोडू पाहतात तर काहीजण दूर गेलेला मित्रवर्गाच्या संपर्कांत राहू पाहतात. यातून काहींना फेसबुकच्या माध्यमातून जिवलग मित्र मिळतात. तर काहींना आपले असलेले मित्र फेसबुकच्या माध्यमातून टिकवता येतात. मात्र, आता फेसबुक केवळ मैत्रीपुरतं मर्यादित राहील नाही आहे. फेसबुकच्या माध्यमातून रक्ताची नसतील पण मायेच्या आणि स्नेहातून एकत्र भेटलेल्या भिन्न व्यक्तींमध्ये आता जिवाभावाची नाती तयार व्हायला लागली आहेत. अशाच एका बहीण-भावाच्या नात्याची कहाणी आपण पाहणार आहोत.

धक्कादायक! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी मोहोळ येथील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाचा मुलगा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवरत्न दीपक गायकवाड, … Read more

मोहिते-पाटलांचे सहकार क्षेत्रावरील वर्चस्व बबन शिंदेंनी काढले मोडीत, ‘विजय शुगर’ मिल केली मालकीची

ल्या सहा-सात वर्षांपासून तब्बल १८३ कोटींची थकबाकी असलेला करकंब येथील विजय शुगर हा कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी लिलावात काढला. या लिलावामध्ये माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी या कारखान्यासाठी १२५ कोटी १० लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे बँकेचा एनपीए झपाट्यान कमी झाला.

सोलापूर जिल्ह्यात मतदान संथगतीने; दुपारपर्यंत केवळ ३३.१२ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.

दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअरर्स; सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम

येत्या २१ तारखेला संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडून दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअर्सची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मी सिंधिया नाही तर ‘शिंदे’च आहे तेव्हा बहीण प्रणितीला विजयी करा – ज्योतिरादित्य सिंधिया

भारताच्या राजकारणात जरी मी सिंधिया असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मी शिंदेच आहे. असं मत मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केलं. आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बहीण प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं.
 

चलती का नाम गाडी; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गाडीचं स्टेरिंग खुद्द प्रणिती शिंदेंकडेच

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे तसा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात जोर लावला आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधतांना त्या दिसत आहेत. असेच सकाळी शहरातील पार्क स्टेडियम भागात कार्यकर्त्यांसोबत फिरत असतांना, तुम्ही एकट्याच महिला का फिरता असा सवाल एका जेष्ठ व्यक्तीने केला. त्यावर ‘एक नारी सबको भारी’ असे चटकन उत्तर देत प्रणिती मिश्कीलपणे हसल्या.

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

अखेर आघाडीत बिघाडी, भारत भालकेंच्या अडचणीत वाढ

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात अखेर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस उमेदवार आमने सामने आले आहेत. काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिल्यान राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.