सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या झाली 68, आज एकाचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाचे आज एकूण 58 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 55 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण हे सारीचे असून एक रुग्ण हा कोरोणाचा होता. कोरोना असलेल्या रुग्णाचा आज सकाळी 11 वाजता मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर कोरोना बाधितांची संख्या 68 वर गेली आहे … Read more

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत. मुलाचं शिक्षणपूर्ण … Read more

सोलापूरमध्ये आज आढळले तब्बल 11 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण, तर सारीमुळे एकाचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आज मोहोळ तालुक्यातील पेनुर हद्दीत आढळला आहे. एका दिवसात सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आकाराने वाढले असून मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या पाच झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मृत्यू झालेल्या सत्तावन वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सारी ची लक्षणे दिसत असल्याने या … Read more

सोलापुरात कोरोनानं गाठलं अर्धशतक,शहरासह ग्रामीण भागात ही कोरोनाचा शिरकाव

सोलापूर प्रतिनिधी । आजपर्यंत सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. सांगोला तालुक्यात कोरोना बाधित व्यक्ती आढळला असून या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सांगोला तालुक्यातील घेरडीमध्ये हा रुग्ण असल्याचे समजते. सोलापूर जिल्ह्यात आज नव्याने सापडलेल्या नऊ रुग्णांमध्ये पाच रुग्ण हे सारीचे आहेत आणि … Read more

सोलापूरातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ४१ वर, बापूजी नगर परिसराआज २ नवे रुग्ण

सोलापूर प्रतिनिधी । शहरातील बापूजी नगर परिसरात आणखीन दोन कोरोना बाधित रुग्ण आज आढळले असून सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एक्केचाळीस झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तसेच शास्त्रीनगर परिसरातील वृद्ध महिलेचा आज सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारीची संशयित रुग्ण म्हणून या महिलेला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more

धक्कादायक! कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची तरुणांनी दुचाकी जाळली

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरात घडला आहे. एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी काही तरुणांनी जाळण्याचा प्रकार कुंभारी  येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडला आहे. मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी (वय 30) या गुरुवारी पती श्रीशैल … Read more

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. सोलापूर शहरांत आज दहा नवीन कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ४२ कोरोना अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट आज प्राप्त झाले. यातील १० जणांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. यापूर्वी शहरात दोन रुग्णांना कोरोणा ची लागण झाली होती. त्यानंतर सदर … Read more

निजामुद्दीन मरकज : बेजबाबदारपणा हिंदूंनी केला की त्यांना जनता म्हटलं जातं अन् मुसलमानांनी केलं तर फक्त मुसलमान म्हटलं जातं

विचार तर कराल | हनुमंत पवार काल सोलापूर जिल्ह्यातील वागदरी खेड्यात यात्रा होती. कोरोनाच्या निमित्तानं यात्रा कमिटीने प्रशासनाला सहकार्य करत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. केवळ दोन तीन व्यक्तींनी देवाची पूजा केली. इथपर्यंत सगळ सुरळीत होतं. प्रशासन आणि यात्रा कमिटीच्या संवादाने सगळं शांततेत पार पडतंय असं चित्र होतं. दरवर्षी पुजेनंतर देवाचा रथ ओढला जातो. ही … Read more

Breaking | जितेंद्र आव्हाड सोलापूरचे नवे पालकमंत्री, दिलीप वळसे पाटीलांची उचलबांगडी

सोलापूर प्रतिनिधी | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याकडे लक्ष देतं नाहीत म्हणून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्याचाच परिणाम म्हणून आज सोलापूर जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाले आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता सोलापूरच पालकत्व आलेलं आहे. माजी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ८३ दिवसांमध्येच उचलबांगडी करण्यात आलीय.एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून दिलीप वळसे पाटलांकडे पाहिले जाते. … Read more

मंगलकार्यालय पै पाहुण्यांनी भरलं होतं…काही तासांत लग्न लागणार होतं पण..

पंढरपूर प्रतिनिधी | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १६७ वर पोहोचला आहे. कोरोनाचा अनेक गोष्टीवर परिणाम पडत आहे. पंढरपुरातील सांगोल्यात पै पाहुण्यांची गर्दी टाळून साध्या पध्दतीने घरीच केला विवाहसोहळा पार पाडल्याचे समजत आहे. सांगोला येथील वैभव इंगोले या तरूणाचा आज विवाह सोहळा नियोजित होता. विवाह सोहळयासाठी मंगल कार्यालयासह सर्व जय्यत … Read more