हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण लोकशाहीसाठी वेकअप कॉल- सरकारी वकील उज्वल निकम
मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २६ वर्षीय वेटरनरी डॉक्टर वर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. यानंतर हैद्राबाद पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता.