खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही

मुंबई । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कोकणात जाण्यासाठी एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं … Read more

शासनाने एसटी महामंडळाची थकबाकी देऊन कर्मचाऱ्यांना वेतन द्या! इंटकची मागणी

मुंबई । महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाचे २६८.९६ कोटी रूपयांची थकबाकी रक्कम तात्काळ देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त झी२४ तास या वृत्तवाहिनीने दिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने परराज्यातील मजुरांना परराज्याच्या सीमेवर पोहचविले. यासाठी … Read more

‘ती’ बातमी चुकीची! कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केलं नाही- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, हे वृत्त चुकीचं असून कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात … Read more

आषाढी एकादशी सोहळा: माउली, तुकोबांच्या पादुकांना पंढरपूरला एसटीने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब

पुणे । पुणे जिल्ह्यातील देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जण बसल्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका … Read more

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये जिंतूर , मानवत … Read more

सोमवारपासून गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सुरू; असे नोंदवा नाव

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक, विद्यार्थी गेल्या मागील काही दिवसांपासून अडकले आहेत. अशा अडकून पडलेल्यांना लोकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून … Read more

खुशखबर! मुंबई, पुण्यात अडकून असलेल्यांची शासन करणार एसटीनं मोफत घरी पाठवणी

मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. राज्यात अंतर्गत प्रवासावर निर्बंध घालत जिल्हा बंदी करण्यात आली. अशा परिस्थितीत मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी, कामधंदा, शिक्षणासाठी आलेले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिक अडकून पडले. दरम्यान आता मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये अडकून असणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शासनाकडून … Read more

एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पुढील सूचना प्राप्त होईपर्यत वेतन न करण्याचे सरकारी आदेश असल्याची माहिती मिळत आहे. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सरकारने आदेश दिले आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळं कमालीची नाराजी आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणून … Read more

आरक्षणाला समाप्त करणं भाजप-आरएसएसच्या डीएनएत आहे, पण आम्ही हे घडू देणार नाही- राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरून मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढविल. राहुल म्हणालेकी, ”भाजप आणि आरएसएसच्या डोळयात आरक्षण नेहमी खुपत आलं आहे. आरक्षणाला रद्द करण्याची त्यांची रणनीती आहे. नोकऱ्यांमध्ये भाजप कधीही आरक्षण कायम ठेवणार नाही, पण आम्ही आरक्षणाला समाप्त होऊ देणार नाही.” संसद परिसरात माध्यमांशी बोलताना राहुल … Read more

ऐन दिवाळीत एसटी कडून तब्बल १० टक्के तिकीट वाढ

दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही १० टक्के भाडेवाढ केली आहे. २४ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कायम राहिल. भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल.