राजेशाही, लोकशाहीची घराणेशाही आणि सरंजामशाही..!!

राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रकाश पवार यांच्या मते महाराष्ट्रात ८९ घराणीच राजकारण करत आहेत. इतर कुठल्या नवीन व्यक्तीला यात स्थान मिळवणे खूपच अवघड आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारण हे फक्त जय आणि पराजय या चष्म्यातून बघितले जाते. एकंदरीत निवडणुकांतला वाढलेला खर्च, झालेले गुन्हेगारीकरण यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच राजकीय पक्षही सहज जवळ करतात आणि लोकही सहज स्वीकारतात ही सत्यपरिस्थिती आहे.

‘स्वतःचा गोंधळ समोर येऊ नये म्हणून विरोधकांचा गोंधळ’; खासदार सुप्रिया यांचा आरोप

दोन दिवसापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विधीमंडळात पहिल्याच दिवशी विरोधकांनी  सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीचे विधिमंडळाच्या कामकाजास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केला. त्यानंतर देशभरात हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले. मात्र समाजातील काहींनी पोलिसांच्या सदर कृत्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यावेळी बलात्कार्‍यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता … Read more

उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी – मायावती

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणले होते. तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती. तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलेले आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उचलला पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा

मागील एक महिना राज्यामध्ये मोठे सत्ता नाट्य घडले. यामुळे राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच चालू होती. मात्र यामध्ये ‘महाविकासाआघाडी’ने बाजी मारत आपली राज्यात सत्तास्थापन केली. मात्र यामध्ये राजकीय पक्षांमधील चर्चा, त्यांचे विश्लेषण, महत्वाचे मुद्दे, त्यांचे निर्णय राज्यातील जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम पत्रकार आणि टेलिव्हिजन न्यूज वाहिन्यांनी केले.

नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले. With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W — … Read more

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याची आज आठवण, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दिला होता दुजोरा

राजकारणात कुणी कायमचा शत्रू व मित्र नसतं असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्र राज्याच्या नवीन सरकार स्थापने संदर्भात होत असलेल्या एकूण राजकीय घडामोडी नंतर दिसून येत आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यावेळी आघाडीचा पाठिंबा घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा निर्णयापर्यंत पोहोचली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला सोबत घेण्यासंदर्भाची भूमिका मागिल काही महिन्यापूर्वीच बदलली होती का? का तो फक्त योगायोग आहे अशी चर्चा आता परभणी जिल्ह्यामध्ये रंगली आहे. त्यावेळी ही बाब कोणीही गांभीर्याने घेतली नव्हती पण आता मात्र तीच चर्चा सगळीकडे रंगली आहे.

राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.

खा. सुप्रिया सुळे यांच्याशी ‘हुज्जत’ घालणारा टॅक्सी चालक अटकेत; चालकाची तक्रार थेट ‘रेल्वे’ मंत्र्यांकडेच

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांना टॅक्सीचालकाच्या मुजोरीचा, अरेरावीचा सामना करावा लागला. खासदार सुळे यांनी ट्विट करत टॅक्सी चालकाने केलेल्या गैरवर्तणूकीची तक्रार थेट रेल्वे मंत्र्यांकडेच केली. सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीनंतर टॅक्सी चालक कुलजीतसिंह मलहोत्रा याला अटक करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. सुळे यांनी ट्विटमध्ये … Read more

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी सहकार ,पणन आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचा भाजप प्रवेश कॉंग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जाते आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळवा घेवून हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारले पुढील राजकारणाची … Read more