तालिबानने क्रिकेटला पाठिंबा देणार असल्याचे पुन्हा म्हंटले, अझीझुल्ला पुन्हा बनला बोर्ड अध्यक्ष

नवी दिल्ली । अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य असले तरी पण त्याचा देशाच्या क्रिकेटवर आणि त्या चालवणाऱ्या मंडळावर परिणाम होणार नाही. रविवारी तालिबान प्रतिनिधींनी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे सदस्य आणि बोर्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर अझीजुल्लाह फाजलीला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष करण्यात आले. तो यापूर्वी मंडळाचे अध्यक्ष होता. अझीझुल्लाहच्या हातात आता अफगाणिस्तान क्रिकेटची कमान असेल आणि भविष्यातील … Read more

तालिबानच्या भीतीमुळे बेघर झालेल्या अफगाणांना ‘या’ देशांनी दिला आश्रय, मदत करणाऱ्यांमध्ये भारताचे नावही सामील

नवी दिल्ली । काबुलमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातील अनेक नागरिकांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. राजधानीतील हमीद करझाई विमानतळावर अनेक दृश्ये पाहायला मिळाली, ज्यामुळे हे सिद्ध झाले की, लोकं तालिबानच्या अधिपत्याखाली राहण्याऐवजी देश सोडून जाणे किंवा या प्रयत्नात आपले प्राण गमावणे निवडत आहेत. मात्र, अनेक देशांनी या संकटग्रस्त अफगाणींना मदत करण्यासाठी हात पुढे केले … Read more

तालिबानमुळे प्रभाव, अफगाणिस्तानातून भारतात होणाऱ्या 50 कोटी किमतीच्या ड्राय फ्रूटचा व्यापार थांबला

चंदीगड । अमृतसर-अटारी-वाघा सीमेवरील इंटिग्रेटेड चेकपोस्ट (ICP) द्वारे अफगाणिस्तानातून होणारी ड्राय फ्रूटची आयात अशरफ घनी सरकार पाडून तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर थांबली आहे. भारत पंजाबच्या अटारी सीमेवरून दरवर्षी अफगाणिस्तान मधून सुमारे 50 कोटी किमतीच्या ड्राय फ्रूटची आयात करतो. एक प्रमुख ड्राय फ्रूट आयातदार बी.के. बजाज म्हणाले की,” सरकार बदलल्यानंतर सरकारी कार्यालये बंद आहेत, ज्यामुळे व्यवसाय … Read more

जो बिडेन यांचा तालिबानला इशारा,”जर आमच्या कामात अडथळा आणला किंवा हल्ला केला तर तुम्हांला योग्य उत्तर मिळेल”

Joe Biden

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी तालिबानला उघडपणे इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की,” जर अमेरिकन सैन्यावर हल्ला झाला किंवा काबूल विमानतळावर लोकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत अडथळा आला तर त्यांना ‘सशक्त’ उत्तर मिळेल.” त्याच वेळी, बिडेन यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की,” त्यांचे प्रशासन दहशतवादविरोधी मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे. या कामात … Read more

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना मोठा धक्का, भाऊ तालिबानमध्ये झाला सामील

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच देश सोडून पळून गेलेले माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांचे बंधू आता अफगाणिस्तानचा विश्वासघात करत आहेत. हशमत गनीने तालिबानशी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. रिपोर्ट नुसार, हशमत गनी यांनी तालिबान नेता खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत दहशतवादी गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. अशरफ घनी सध्या आपल्या … Read more

तालिबानने 3 जर्मन पत्रकारांच्या घराची घेतली झडती, एकाच्या नातेवाईकाला घातल्या गोळ्या

काबूल । अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान मीडिया पर्सन आणि पत्रकारांना लक्ष्य करत आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार, तालिबान्यांनी काबुलमध्ये काम करणाऱ्या जर्मन वृत्तवाहिनी ड्यूश वेलेच्या पत्रकाराच्या नातेवाईकाची हत्या केली आहे. रिपोर्ट नुसार, तालिबानी एका अफगाण पत्रकाराच्या शोधात घरात घुसले होते. या दरम्यान त्याच्या नातेवाईकाला गोळी लागली आणि दुसरा जखमी झाला. पत्रकाराचे बाकीचे कुटुंब गेल्या महिन्यात काबूलमधून कसे … Read more

“प्लीज सर वाचवा, तालिबान मारून टाकेल …” अमेरिकन सैन्याकडे विनवणी करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ झाला व्हायरल

काबूल । तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर धक्कादायक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक अफगाण मुलगी अमेरिकन सैनिकांकडे आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करत आहे. ती म्हणते, ‘प्लीज सेव्ह सर … तालिबान मला मारेल.’ हिजबुल्लाह खान या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो … Read more

तालिबान नेत्यांची घोषणा,”हिंदू – शीख प्रत्येकाला सुरक्षा देणार, सूड घेतला जाणार नाही”

काबूल । अफगाणिस्तानात दोन दशकांनंतर तालिबान परतला आहे. यानंतर तेथील लोक घाबरले आहेत. भीतीने लोकांना कोणत्याही प्रकारे देश सोडून जायचे आहे. काही लोकांनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे. दरम्यान, काबुलमध्ये असलेल्या गुरुद्वाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तालिबानचे नेते काबूलमधील गुरुद्वारा साहिबमध्ये पोहोचल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह … Read more

तालिबानने महिलांसाठी बनवले आहेत ‘हे’ 10 नियम, टाईट कपड्यांपासून ते हाय हिल्स घालण्यावरही बंदी

काबुल । तालिबानी राजवटीत महिलांसाठी असे कठोर नियम आणि कायदे बनवले जातात, जे मानवाधिकाराचे थेट उल्लंघन आहेत. शरिया कायद्यानुसार महिलांचे सर्व अधिकार हिरावून घेतले जातात. 2001 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य होते तेव्हा महिलांना खूप त्रास सहन करावा लागला. पुन्हा एकदा दैनंदिन जीवनात महिला आणि मुलींना त्याच नियमांनुसार जगावे लागेल. तालिबानचे असे 10 नियम, जे … Read more

तालिबानवर सोशल अ‍ॅटॅक ! WhatsApp अकाउंट्स करणार ब्लॉक, फेसबुक आणि यूट्यूबवरही घातली जाणार बंदी

वॉशिंग्टन । सोशल मीडिया कंपनी फेसबुक देखील तालिबानच्या विरोधात मोठ्या कारवाईची तयारी करत आहे. कंपनीने म्हटले आहे की,” ते तालिबानच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सवर बंदी घालणार आहेत, कारण ते त्यांना दहशतवादी संघटना मानतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तालिबान्यांना रोखण्यासाठी फेसबुक अफगाण तज्ञांची मदत घेईल. फेसबुकने ‘डेंजरस ऑर्गनायझेशन पॉलिसीज’ अंतर्गत तालिबानला त्यांच्या सर्व सर्व्हिसवर बंदी घातली आहे. तालिबानने कंपनीच्या या … Read more