तालिबानच्या भीतीमुळे बेघर झालेल्या अफगाणांना ‘या’ देशांनी दिला आश्रय, मदत करणाऱ्यांमध्ये भारताचे नावही सामील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काबुलमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातील अनेक नागरिकांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. राजधानीतील हमीद करझाई विमानतळावर अनेक दृश्ये पाहायला मिळाली, ज्यामुळे हे सिद्ध झाले की, लोकं तालिबानच्या अधिपत्याखाली राहण्याऐवजी देश सोडून जाणे किंवा या प्रयत्नात आपले प्राण गमावणे निवडत आहेत. मात्र, अनेक देशांनी या संकटग्रस्त अफगाणींना मदत करण्यासाठी हात पुढे केले आहेत. या मदत करणाऱ्या हातांमध्ये भारताचे नावही सामील आहेत.

अफगाणिस्तानातून पळून जाणारे बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत असल्याचे वृत्त आहे. आकडेवारी दर्शवते की, 26 लाख अफगाण निर्वासितांपैकी 90 टक्के निर्वासनानंतर या देशांमध्ये गेले आहेत. गेल्या मे महिन्यापासून सातत्याने लोकं पलायन करत आहेत, रविवारी तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेने म्हटले की,”बहुतेक अफगाणी देश सोडण्यास असमर्थ ठरत आहेत, जे धोक्यात येऊ शकतात आणि त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही.”

हे देश देत आहेत आश्रय
अमेरिका
आतापर्यंत 1200 अफगाण लोकांना बाहेर काढून अमेरिकेत आणण्यात आले आहे. ‘ऑपरेशन अलायन्स रेफ्युजी’ अंतर्गत येत्या आठवड्यात ही संख्या 3500 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अमेरिका 10 हजार अफगाण नागरिकांना घेऊ शकते अशी बातमी आहे. यामध्ये अमेरिकन सरकारला मदत करणाऱ्यांचा समावेश आहे.

कॅनडा
गेल्या आठवड्यात कॅनडाने 20,000 अफगाण निर्वासितांना घेण्याचे आश्वासन दिले. त्याच वेळी, शुक्रवारी, मेंडिसिनो म्हणाले की,”सरकार खुल्या मनाने या संख्येत वाढ करण्याचा विचार करत आहे.” एका मुलाखतीत ते म्हणाले कि,”आपण सर्व शक्यतांसाठी दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. “कॅनडा अफगाणिस्तानमधील पाश्चिमात्य कारवायांमध्ये मदत करणाऱ्या अफगाण नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांच्या युतीचा भाग आहे.

ब्रिटन
नवीन पुनर्वसन कार्यक्रम पहिल्या वर्षी पाच हजार अफगाणांचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. ब्रिटनने मंगळवारी याची घोषणा केली. या कार्यक्रमात महिला, मुली आणि धार्मिक तसेच इतर अल्पसंख्याकांना प्राधान्य दिले जाईल.

भारत
गेल्या आठवड्यात, अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये, भारताने ई-व्हिसाच्या नवीन श्रेणीचा समावेश केला होता, ज्या अंतर्गत अफगाण नागरिकांच्या अर्जांवर त्वरीत प्रक्रिया केली जाणार होती. सध्या, हे व्हिसा 6 महिन्यांसाठी व्हॅलिड आहेत आणि पुढील योजनांवर केंद्राकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पाकिस्तान
पंतप्रधान इम्रान खानने जूनमध्येच म्हटले होते की,” जर तालिबानने ताबा घेतला तर ते अफगाणिस्तानसोबतची त्यांच्या सीमा बंद करतील.” मात्र, अद्यापही अफगाणांसाठी सीमा खुल्या आहेत.

इराण
इराणमधील संभाव्य निर्वासितांसाठी तात्पुरती शिबिरे उभारली जात आहेत. सीमा व्यवहार विभागाच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रमुख हुसेन गॅसेमी यांनी IRNA वृत्तसंस्थेला सांगितले की,”इराणला पोहचलेल्या कोणत्याही अफगान्यांना तेथील परिस्थिती सुधारल्यानंतर परत पाठवले जाईल.”

त्याच वेळी, अमेरिकेची विनंती स्वीकारून युगांडा आणि अल्बेनिया आणि कोसोवोने तात्पुरत्या स्वरूपात अफगाण निर्वासितांच्या प्रवेशाला परवानगी दिली आहे. त्याच वेळी, उत्तर मॅसेडोनिया 450 अफगाण निर्वासितांना तात्पुरते सामावून घेईल.

Leave a Comment