मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘अयोध्या’वारीचा दिवस ठरला! या दिवशी करणार प्रयाण

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत जातील, ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यानुसार अयोध्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून येत्या ७ मार्चला मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

मला शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचंय – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान … Read more