उद्धव ठाकरेंनी माझे फोनच घेतले नाहीत; त्यांचे नेते मात्र खालच्या पातळीवरचे आरोप करतच राहिले

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

अमित शहा यांनी केली उद्धव ठाकरेंशी ‘फोन पे चर्चा’; लवकरच होणार दोघांत बैठक

विधानसभा निकालात सर्वात जास्त जागा मिळवत भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेचा तिढा अजून कायम आहे. सध्या शिवसेना ५६ तर भाजप १०५ जागा मर्यादित राहिली आहे. मात्र राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेना नेमके कोणासोबत सरकार स्थापन करणार हा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोन जरी शुभेच्छा देण्यापुरता नसून सत्तास्थापनेच्या व्यवहारासाठी झालेला आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

अहमदनगर प्रतिनिधी । ‘दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं’ अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर येथे आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. १५ वर्ष सत्तेत असताना … Read more

संजय दीना पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र कायम रहिले. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. निवडणुक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर, रश्मी बागल, जयदत्त क्षीरसागर अशा नेत्यांनी खांद्यावर भगवा … Read more

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

मुंबई प्रतिनिधी। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक … Read more

युती बाबत मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागावर निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तांचे मात्र त्यांनी फेटाळून लावले. दोन्ही पक्ष आघाडी करून निवडणूक लढणार … Read more

अखेर युतीचं ठरलं ! उद्धव ठाकरेंनी देखील दिला या फॉर्म्युल्याला ग्रीन सिग्नल

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युतीच्या फॉर्म्युल्यावर अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र सर्व तर्क वितर्क आता निकाली निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात झालेल्या चर्चेत युतीचा फॉर्म्युला पक्का केला आहे. तो फॉर्म्युला घेऊन सुभाष देसाई मातोश्रीवर गेले असता उद्धव ठाकरे यांनी देखील त्या फॉर्म्युल्याला ग्रीन सिंग्नल दिला आहे. … Read more

युतीच्या फॉर्म्युल्यावर गिरीश महाजन म्हणतात

नाशिक प्रतिनिधी भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल, त्याबाबत मध्ये कोणीही काही मत मांडण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू झाली असली तरी जागावाटपासाठी ५०:५० चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला … Read more

राष्ट्रवादीचा लोकसभा उमेदवार झालेल्या त्या शिवसेना नेत्याची उद्या घर वापसी

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांची उद्या घर वापसी होणार आहे. अर्थात ते उद्या शिवसेनेत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीला त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणे पसंत केले होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी करण्याची संधी देखील दिली मात्र भाजपच्या भरती पवार यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी भाजपमध्ये … Read more