सत्तास्थापनेमुळं उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर!

सर्वांचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नियोजित अयोध्या दौरा लांबीवर पडला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याकारणाने त्यांनी आपला दौरा पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकालाचं स्वागत केलं होतं.

उद्धव ठाकरेंनी दिलं शेतकऱ्यांना वचन, ‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार!’

आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. सांगली व सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतांची पाहणीसाठी ते दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील मायणी कातरखटाव या भागातील दाक्ष,बाजरीच्या पिकांची त्यांनी पाहणी केली.

शिवसैनिकाची ‘शोले’गिरी! महायुतीचं सरकार स्थापन करा नाहीतर टॉवरवरून खाली उतणार नाही

महाशिवआघाडी सध्या राज्यातील सरकार स्थापनेवरून सत्तानाट्य सुरु असून भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी देखील बहुमत सिद्ध न करू शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. भाजपसोबत झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेऊन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात एक नवी राजकीय त्रिकुट तयार होऊन महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे-काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक, फिफ्टी-फिफ्टी वरून पेच

राज्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं भाजपाशी नातं तोडलं असताना महासेनाआघाडीच्या रूपात नवं समीकरण तयार होताना दिसत आहे. त्यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकत्रित सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांची राज्यातील काँग्रेस नेत्यांबरोबर मुंबईत महत्वाची बैठक सुरु आहे.

राज्यपाल गयारामच, महाराष्ट्र चालवणं म्हणजे पोरखेळ नाही – उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा धावता आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या वेळेतच शिवसेनेला बसवण्यात आलं. भाजपने असमर्थता दर्शवण्यासाठी वेळ घेतला असल्याची टीका करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आम्ही सोमवारी पहिल्यांदाच अधिकृत चर्चा केली आहे. काँग्रेसने हे स्वतःहून सांगितल्यामुळे भाजपच्या आरोपांना आता उत्तर मिळालं असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांचं महादेवास साकडं

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी आज कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात शिवसैनिकांनी मंत्रौचार करत महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला. यावेळी उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अस साकडं घातले. शिवसैनिकांनी महादेवाला घातलं. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात बैठक, सत्तास्थापनेचा सेनेचा प्रस्ताव

सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी-सेनेत आता निर्णायक हालचाली घडताना दिसत आहेत. गेल्या तासाभरापासून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात खलबतं सुरु आहेत. तसेच शिवसेननेने राष्ट्रवादीसमोर सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

सरकार शिवसेनेचचं येणार! उद्धव ठाकरेंनी दिला चिंताग्रस्त आमदारांना विश्वास

उद्धव ठाकरे यांनी आज मालाड येथील हॉटेल ‘रीट्रीट’मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या आमदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. ‘आमदारांनी कसलीही चिंता करू नये. महाराष्ट्रात आपलंच सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्रीही आपलाच होणार आहे,’ अशी ग्वाही उद्धव यांनी दिली.

तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे..!!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.