जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च बॉक्सर फ्लॉयड मेवेदर उचलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी बॉक्सिंग चॅम्पियन फ्लॉयड मेवेदरने जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्कार आणि शोकसभेचा खर्च देण्याची ऑफर केली, जी त्याच्या कुटुंबीयांनी स्वीकारली आहे. मेवेदर प्रमोशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिओनार्ड एलेर्बे यांनी सांगितले की,’ ते स्वतःच त्या कुटुंबाशी संपर्कात आहेत. फ्लॉयडचे मूळ शहर हॉस्टनमध्ये ९ जूनला त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत ज्याचा संपूर्ण खर्च ते उचलणार आहे. … Read more

अमेरिकेच्या डब्ल्यूएचओपासून वेगळे होण्याबाबत चीनने वक्तव्य म्हणाले, हे तर ‘पावर पॉलिटिक्‍स’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच अमेरिकेने डब्ल्यूएचओ बरोबरील आपले संबंध संपवले आहेत. यावर आता चीनने विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की,’ जागतिक आरोग्य संघटनेपासून अमेरिकेचे वेगळे होणे हे ‘पॉवर पॉलिटिक्स’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,’ आंतरराष्ट्रीय समुदाय हा अमेरिकेच्या या वृत्तीशी सहमत नाही आहे. अमेरिका डब्ल्यूएचओपासून वेगळी होत आहे तसेच … Read more

टेलर स्विफ्ट ची डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी; म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय माणसाची गौरवर्णीय पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा वर्णवाद उसळून आला आहे. तो अधूनमधून वर येत असतो. ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याचे नाव जॉर्ज फ्लाईड असे होते. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. यावर विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला … Read more

तरच अमेरिका पुन्हा सहभागी होईल; ट्रम्प यांनी WHOसमोर ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. निष्पक्ष भूमिका सोडून चीनची तळी उचलून धरणे, कोरोना संसर्गाची माहिती लपवणे आदी आरोप ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर लावले होते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा आवश्यक असून भ्रष्टाचार आणि चीनला झुकतं माप देणे बंद … Read more

लॉकडाउन मध्ये शिथिलता येताच सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात स्थानिक सराफा बाजार बंद आहेत, तरीही सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्याच्या संकटाच्या काळात धोका टाळण्यासाठी गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीवर अधिक अवलंबून आहेत. यामुळेच सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. १५ मे रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत … Read more

अमिरिकेत पोलीस कोठडीत आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर उसळल्या दंगली

वृत्तसंस्था । अमेरिकेत पोलीस कोठडीत एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे अमेरिकेत हिंसक पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये हिंसाचार, दंगली सुरु आहेत. जॉर्ज फ्लॉयड नावाच्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. या प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात … Read more

अभिमानास्पद! मेजर सुमन गवानी बनली UN कडून सन्मानित होणारी पहिली आर्मी अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात मेजर असलेल्या सुमन गवानी यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) वतीने प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यूएनचे महासंचालक अँटोनिया गुतारेशे यांनी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मेजर सुमन यांना हा पुरस्कार इंटरनेशनल डे ऑफ यूनाइटेड नेशंस पीसकीपर्स निमित्त देण्यात आला. लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. २०१८ … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

अमिरिकेने तोडले WHO सोबतचे सर्व संबंध; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन । जागतिक आरोग्य संघटनेवर(WHO) चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे, असा आरोप करत, या संघटनेसोबत अमेरिकेचे असलेले सर्व संबंध तोडत आहोत, अशी घोषणा अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. WHO कोरोना विषाणूला सुरुवातीच्या स्तरावरच रोखण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेतून बाहेर पडताना केला केला. कोरोना महामारीवरून याआधीही ट्रम्प यांनी संघटनेवर अनेक आरोप … Read more

ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला … Read more