Wednesday, March 29, 2023

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा विचार गरीब करणार नाहीत. परिस्थितीमुळे नाईलाजास्तव अनेकांना शिक्षणाला मुकावे लागेल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत या शिक्षणाला  मुकणाऱ्या मुलांना शोधून त्यांना प्रवाहात आणले पाहिजे असे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून सांगितले आहे. तसे आवाहनही त्यांनी केले आहे.

अमेरिकेसारखा देशही या साथीमुळे हादरला आहे मग आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता याचा फटका मोठं असणार आहे. परिणामी बेरोजगारी, आरोग्य, शिक्षणहेप्रश्नऐरणीवरचे आहेत.आधीच शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण आपल्याकडं खूप मोठं आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याचा धोका आहे. यातूनच गरीब, दारीद्रेरेषेखालील लोक व अकुशल कामगार यांची संख्या प्रचंड वाढेल. त्यामुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या मुलांना शोधून पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. कारण आज एखादं मूल शिक्षणापासून वंचित राहिलं तर त्याचा परिणाम दिसून यायला पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे. असे आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक व ट्विटर च्या अकॉउंटवरून केले आहे.

- Advertisement -

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करण्यासाठी भविष्याचा विचार करून माहिती तंत्रज्ञानाधारीत आराखडा बनवण्याची गरज आहे. जेणेकरून घरबसल्या परवडणारं ऑनलाइन शिक्षण घेण्याचा पर्यायही खुला होऊ शकेल. असा पर्याय त्यांनी सुचविला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी, “शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा पाया असतो. शिक्षणाचं प्रमाण जेवढं वाढेल तेवढं आपल्याकडे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि जेवढं जास्त कुशल मनुष्यबळ निर्माण होईल तेवढी जास्त वेगाने अर्थव्यवस्था प्रगती करेल. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांनी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी मंडळी, तज्ज्ञ, संस्था चालक या सर्वांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलावीत.” असे आवाहन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.