लसीकरणाचा टक्का घसरला ! जिल्हाधिकारी व सीईओंना विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर … Read more

मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! लस घेतली असेल तरच मिळणार दारू

औरंगाबाद – कोरोना लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि … Read more

लस न घेतल्यास संबंधितांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणा-या चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी ती घ्यावी, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 25 नोव्हेंबरपासून सुरु … Read more

‘नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’ चा आदेश मागे घ्या, अन्यथा… 

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात लसीकरण व्हायलाच हवे मात्र प्रशासनाने सक्ती करू नये. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला आलेले अपयश शहरवासीयांच्या माथी थोपवू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत नुकताच काढलेला फतवा पुढील २४ तासात मागे घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकार्‍यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा औरंगाबाद मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने क्रांतीचौक येथील पेट्रोल … Read more

कोरोना लस न घेतलेल्यांना पेट्रोल दिलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण पेट्रोल पंप सील; पहा व्हिडीओ

pp

औरंगाबाद – जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबरमध्ये जारी केले होते. ह्या … Read more

लसीकरणामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

Crime

 ओैरंगाबाद – चित्तेगाव उपकेंद्र येथे काल (दि 20) लसीकरण मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या गोरख रामभाऊ शिंदे व निलाबाई शिंदे यांच्यावर बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये आज गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी त्यांना त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. लसीकरणाच्या राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वत: या … Read more

लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापना

sunil chavaan

औरंगाबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी व लसीकरण पथकांना सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापणा केली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असणार असून ग्रामसेवक सदस्य सचिव असणार आहेत. समिती सदस्यामध्ये उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस … Read more

मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार निलंबनाची कारवाई

Sunil chavhan

औरंगाबाद – आता सर्वकाही अनलॉक होत असताना कोरोनाचा धोका अधिक वाढू नये तसेच लोकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे. मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा टास्क … Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील 1344 गावांपैकी ‘इतकी’ गावे शंभर टक्के लसवंत

औरंगाबाद – देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा देशाने पार केला असला तरी औरंगाबाद जिल्ह्यात 1344 गावांपैकी केवळ 56 गावांचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरित गावांचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. यात औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावांनी शंभर टक्के लसीकरण करून आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिकांकडून … Read more

लसीकरणात ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा तालुकाच मागासलेला

औरंगाबाद – ग्रामीण भाग लसीकरणात मागे पडल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी कंबर कसली असून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर लसीकरनात वाढ झाली आहे. असे असले तरी मात्र ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा तालुका अद्यापही लाल यादीत असून जिल्ह्यात सर्वात मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर त्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे … Read more