कोरोना लस न घेतलेल्यांना पेट्रोल दिलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण पेट्रोल पंप सील; पहा व्हिडीओ

औरंगाबाद – जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबरमध्ये जारी केले होते.

ह्या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः शहरातील बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा नो व्हॅक्सिन नो पेट्रोल या आदेशाचा भंग केल्याचे तसेच मास्कचा वापर न करणे, लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे अशा गोष्टी निर्दशनास आल्या.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार श्रीमती सोनाली जोंधळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व राजेंद्र शिंदे जिल्हा पुरवठा निरीक्षक औरंगाबाद यांनी काल रात्री बाबा पेट्रोल पंप सील केला.