जिल्ह्यातील सहा लाख नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात … Read more

मनपाच्या आरोग्य केंद्रात चमत्कार ! लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

corona vaccine

औरंगाबाद – रस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन ॲप हॅक करण्याचे प्रकार शहरात सुरूच आहेत. मंगळवारी मनपाच्या बायजीपुरा आरोग्य केंद्रावर तीन जणांनी लस न घेता प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेत तातडीने एका व्यक्तीचे रजिस्ट्रेशन रद्द केले. दोन जणांना प्रमाणपत्र मोबाईल वर गेले. त्यातील एका … Read more

येत्या 15 दिवसांत तालुक्यात 100 टक्के लसीकरण; राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा निर्धार

sattar

औरंगाबाद – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे अवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले. आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने कोणीही लसीकरण पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला … Read more

‘त्या’ घोटाळ्यातील मास्टर माईंड चा शोध सुरू

औरंगाबाद – शहरातील पहाडसिंगपुरा भागातील डीकेएमएम महाविद्यालयातील मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 नागरिकांना बोगस लस प्रमाणपत्र दिल्याचे नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातील मास्टरमाइंड व्यक्तीचा आता पोलीस तसेच मनपाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप लाभार्थ्यांना हात लावलेला नाही. गरज पडली तर लाभार्थ्यांना ही विचारावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डीकेएमएम … Read more

खळबळजनक ! वेबसाईट हॅक करून लस न घेताच प्रमाणपत्र मिळविणासाठी तब्बल 16 नावे

moderna vaccine

औरंगाबाद : लस न घेताच प्रमाणपत्र घेण्याचा काहीजणांचा प्रयत्न असतो. लस न घेताच एकाच कुटुंबातील 16 जणांची नावे वेबसाईटमध्ये आढळून आली. डी के एम एम लसीकरण केंद्रात हा प्रकार घडला. डाटा ऑपरेटर च्या सतर्कतेमुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मनपाने चौकशी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी याप्रकरणी तक्रार दिल्याची … Read more

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच; लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

औरंगाबाद – सध्या शहरात लसींचा साठा वाढताच नागरिकांचा प्रतिसाद थंडावला असून, दररोज सुमारे चार ते पाच हजार एवढेच लसीकरण होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या टोकनसाठी लसीकरण केंद्रावर लागणाऱ्या रांगा आता बंद झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लस घेण्यासाठी रांगेत धक्काबुक्की होत असल्याचे चित्र होते पण महापालिकेकडे सध्या एक लाखापेक्षा जास्त कोविशिल्ड लसी आहेत. असे असताना … Read more

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

karad

औरंगाबाद – कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी नागरिकांना केले. बजाज समूह आणि जिल्हा प्रशासनात मोफत कोविड लसबाबत सामंजस्य करार लासूर स्टेशन येथे पांडव लॉन्स याठिकाणी झाला. … Read more

लसीकरणाबाबत उदासीनता; औरंगाबाद जिह्यात केवळ 11 टक्के जनतेचे लसीकरण

covid vaccine

औरंगाबाद – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे. मात्र, आता लस घेण्यास प्रतिसाद मंदावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०.९४ टक्केच लसीकरण झाले असल्याने संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान कायम आहे. शहरातही कोरोनाचे दोन्ही डोस घेणऱ्यांची संख्या १६.९९ टक्के आहे, तर ग्रामीण भागात हीच टक्केवारी ७ .७६ एवढी नोंदली गेली आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात … Read more

खळबळजनक ! औरंगाबादेत कोरोना लसींचा काळाबाजार उघडकीस

औरंगाबाद – सध्या देशभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. यास नागरिक देखील उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु लसीच्या कमतरतेमुळे प्रत्येकाला लास उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या काळाबाजाराच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. यातच आता औरंगाबादेत देखील लसींचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. शहराजवळच असलेल्या साजापूर भागात कोरोना लसीचा काळाबाजार करणाऱ्या आरोग्य सेवकास … Read more

औरंगाबादेत लसींचा ठणठणाट; लसीकरणासाठी नागरिकांची वणवण

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासन यासाठी उपाययोजना करत असून लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्यामुळे लस केव्हा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेकडून होणाऱ्या लसीचा तुटवडा चिंताजनक असून दुसऱ्या … Read more