बंदला परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद; CAAच्या विरोधात सर्वत्र निदर्शनं

वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघानेच्या वतीने, आज NRC आणि CAA ला विरोध करत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालूक्यांमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच दुकाने यावेळी सकाळपासूनच बंद आहेत. रस्त्यावरही दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत आहे.

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया हॉस्पिटलला द्या – प्रकाश आंबेडकर

पुणे : इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध आहे, त्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जो निधी आंबेडकर पुतळ्यासाठी किंवा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दिला असेल तो निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काढावा, अशी माझी विनंती आहे. … Read more

CAA, NRC विरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; वंचित बहुजन आघाडीची हाक

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा(CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC) आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली. या बंदला ३५ संघटनांनी पाठींबा दिला … Read more

वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य – आनंदराज आंबेडकर

औरंगाबाद : “वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं, असा आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 26 व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तसेच नवीन पर्याय देणार असल्याचेही म्हंटले आहे. आनंदराज आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीला … Read more

आम्ही प्रश्न विचारले म्हणूनच फडणवीस सरकार पडले, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बाबतीत वेगवेगळी मतांतरे पुढं येत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नव्या सरकारबद्दल आपली प्रतिक्रिया एक विडिओ जारी करत दिली आहे. या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा आधार घेत आंबेडकर यांनी एक मोठ विधान केलं. भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा निवडणुकीपूर्वीच झाला होता असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होत. याबाबत ‘आम्ही वारंवार सरकारला प्रश्न विचारात राहिलो त्यामुळंच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला’ असा दावा आंबेडकर यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीने ‘यांच्या’ २३ जागा पाडल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या दोन पक्षांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी हा वेगळा प्रयत्न राज्यात राबविताना समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा विचार केला. दलित आणि मुस्लिम मतांचा विचार यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला होता.

काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद पाडून राज्यातील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, आमचा पक्ष तुमच्यासाठी कार्य करेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उमरगा  येथील सभेत केले.

पुर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोर होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत – प्रकाश आंबेडकर

पूर्वीचे आघाडी शासन म्हणजे भुरटे चोरटे होते तर आताचे सत्ताधारी डाकू आहेत. आघाडीतील पक्ष हाती लागेल ते घेऊन जायचे, आताचे सत्ताधारी संघटीतपणे भ्रष्टाचार करतात’ अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकार केली. आज पाथरी व परभणी येथील वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजीत जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.