खडसे, मुंडेंना भाजपचा पुन्हा दे धक्का! विधान परिषदेसाठी उभे केले ‘हे’ ४ उमेदवार

मुंबई। येत्या २१ मे ला होऊ  घातलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळानुसार भाजपला चौथ्या जागेसाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या ओबीसी नैतृत्व एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने … Read more

विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे, म्हणाल्या..

मुंबई । येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा … Read more

संग्राम विधान परिषदेचा: शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे निवडणूक रिंगणात

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक घेण्याची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने … Read more

महाराष्ट्राची पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच ‘हा’ निर्णय झाला- संजय राऊत

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राची … Read more