वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

महारूगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्हेंटीलेटरवर; रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात

महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

साताऱ्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनामुक्त, ४५ वर्षीय महिलेचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह

साताऱ्यातील ४५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा दुसरा टेस्ट रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने सातारकरांच्या मनातील भीती आता कमी झाली आहे.

कोरोनाशी लढण्याचा केरळ पॅटर्न; मृत्यू कमी, सुरक्षित जीवनाची हमी

देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. यानंतर केरळने प्रतिबंधासाठी उचललेली पावलं अधिक सकारात्मक आणि अनुकरणीय आहेत.

कोरोनाव्हायरसची दहशत : त्याने जमिनीखाली गाडल्या ५००० जिवंत कोंबड्या

बेळगावमधील एका पोल्ट्री व्यावसायिकाने ५००० जिवंत कोंबड्या गाडल्या आहेत.

कोरोनाव्हायरसची भीती वाढली; सौदीवरून 40 पर्यटक कोल्हापूरात परतले

कोरोनाव्हायरसपासून सुटका करुन घेण्यासाठी सौदी अरेबियावरुन आलेले पर्यटक तपासणी न करताच घरी पळाले आहेत.