राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकने घेतली पोलीस ठाण्यातच फाशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यवतमाळ जिल्हयात एका साहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच फाशी घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले साहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके यांनी काल रात्री उशिरा फाशी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री १ वाजेपर्यंत ते कामावर होते. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या कक्षात बसून होते. … Read more

यवतमाळमध्ये वीज पडून युवकाचा मृत्यू ; प्रत्यक्ष मृत्यू पाहिल्याने कुटुंबीयांची कालवाकालव

शहादत खान हा आंब्याच्या झाडाखाली थांबला. तर त्याचे वडील आणि इतर कुटुंबीय जवळील झोपडीच्या आडोशाला. विजेचे रुद्र रूप पाहून त्याच्या वडिलांनी आणि भावंडांनी शहादतला हाकाही मारल्या होत्या. परंतु तेवढ्यातच शहादतच्या अंगावर अचानक वीज कोसळली आणि त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

शेतकरी आत्महत्येला शेतकरीच जबाबदार- प्रकाश आंबेडकर

यवतमाळ प्रतिनिधी। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शेतकरीच जबाबदार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी विवादास्पद वक्तव्य केलं आहे. यवतमाळ इथं बोलतांना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. शेतकरी जात पाहून मतदान करतो. त्यामुळं शेतकऱ्याची ही अवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास कापसाला हमी भावाप्रमाणे पैसे मिळतील. तर जात पाहून मतदान केल्यास 3500 रु प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार. असं म्हणून … Read more

आदर्श गावातील गावकऱ्यांनी केले ताट-वाटी वाजवीत आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ जिल्हयाच्या बोरी अरब क्षेत्रातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांढुर्णा बोद गव्हाण येथील नागरिकांत ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल असंतोष खदखदत आहे. या ग्रामपंचायतीन भ्रष्ट व अनियमित कारभाराचा कळस गाठल्यामुळ शेवटी जनतेला उठाव करावा लागला. याकरिता आवाज उठवून गावकऱ्यांनी ताट-वाटी वाजवीत ग्रामपंचायतीला विविध विकास कामाकरिता मिळालेला निधी व केलेल्या खर्चात झालेला भ्रष्टाचार गटविकास अधिकारी यांच्या … Read more

शिवशाहीच्या धडकेत एक ठार; बसचालकासह प्रवासीही जखमी

यवतमाळ प्रतिनिधी | महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही या भाडेतत्त्वावरील गाड्या ताफ्यात दाखल केल्या, मात्र त्या दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या अपघाताचा आलेख मात्र वाढतच जात असल्याची परिस्थिती आहे. या गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठीचा हेतू ठेऊन जरी ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी प्रवाशांना मात्र आरामा ऐवजी मनस्ताप आणि नुकसानच सहन करावं लागत आहे. अशीच एक घटनायवतमाळ … Read more

अज्ञानाचा फायदा घेऊन आदिवासी वृद्धाची बँकेतच केली रोकड केली लंपास

यवतमाळ प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा इथं वास्तव्यास असलेले लखमा कोंडेकर मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पैसे काढण्याकरिता आले असता त्या बँकेतूनच त्यांचे पैसे चोरी झाले. ही सगळी घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की या वृद्धान एका अनोळखी इसमास पैसे काढण्याची पावती लिहून मागितली. त्यावर २ हजार रुपये … Read more

भर रस्त्यात तस्करीची वाळू ओतून अधिकाऱ्यांना शिवीगाळ

  यवतमाळ प्रतिनिधी | वाळू तस्कर किती बेलगाम झाले आहेत याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे आला. वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच घाटंजी तहसीलचे तलाठी अनंत चवडे आणि नायब तहसीलदार मिरगणे आदी कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाळूचा ट्रॅक्टर अडवून वाळू वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीचा परवाना मागितला. अधिकाऱ्यांच्या विचारणेला प्रतिसाद न देता वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी भर … Read more

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी?

Thumbnail

विशेष लेख | अप्पा अनारसे १९ मार्च १९८६ यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पवनार येथे जाऊन सहकुटुंब आत्महत्या केली होती. ही नोंदवली गेली पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या घटनेला आज ३३ वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काही साजरा करण्याचा दिवस नाही. पण या दुःखद घटनेची आठवण म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या … Read more