गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनचा भीषण अपघात

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पिक अप व्हॅनमधील क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.संबंधित पिक अप व्हॅन वरोऱ्याच्या दिशेने निघाली असताना वाटेत गाय आडवी आली, त्यावेळी गायीला धडकण्यापासून वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅन चालकाने जोरदार ब्रेक मारला. त्यामुळे ड्रायव्हरचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि … Read more

धक्कादायक ! ‘या’ क्षुल्लक कारणावरून लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दारूच्या आहारी गेलेल्या लहान भावाने वडिलांकडे पैसे मागितले हे पाहून मोठ्या भावाने त्याला हटकले. याचा लहान भावाला राग आला म्हणून त्याने रागाच्या भरात मोठ्या भावाची हत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातील घाटी बेघर परिसरात ही मन सुन्न करणारी घटना घडली … Read more

पेशंट महिलेला गुंगीचे औषध देऊन डाॅक्टर बनवायचे अश्लिल व्हिडिओ; त्यानंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या डॉक्टरला अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गणेश साठे (रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक जुना उमरसरा) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील जुन्या उमरसरा येथे आरोपी डॉक्टर आणि त्याच्या पत्नीकडून उमरसरा परिसरात निसर्गोपचार केंद्र … Read more

हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्येच बोलावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारकडून नेहमी निशाणा साधला जात असल्यामुळे राज्यपाल चर्चेत राहत आहेत. दरम्यान ते आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे मराठी भाषेच्या मुद्यावरून यवतमाळ येथील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी भाषे संदर्भात आग्रही भूमिका घेतली. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात … Read more

ध्येयवेड्या रँचोचा दुर्देवी मृत्यू; स्वतः बनविलेलेले हेलिकॉप्टर उडविण्याचा प्रयत्न बेतला जीवावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हौसेला मोल नसत असं म्हणतात. मात्र, ती हौस पूर्ण करीत असताना ती आपल्या जीवावर बेतणार नाही ना याची तितकी काळजीही घ्यावी लागते. नाहीतर हौस करताना जीवही जातो. अशी घटना यवतमाळ येथील फुलसावंगी गावात घडली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावातील शेख इस्माईल शेख इब्राहिम या रँचोचा हेलीकॉप्टर उडवताना अपघाती मृत्यू झाला आहे. … Read more

जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची … Read more

प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट यवतमाळमधील घटना

crime

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ मध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने भावी नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला शीतपेयातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची कबुली भावी पत्नीनेच दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. हि … Read more

कोरोनाने नाही व्यसनाने घेतला जीव ! दारू मिळेना म्हणून सॅनिटायझर पिवून भागवली तलप , 7 जणांचा मृत्यू

death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : व्यसन कोणतेही असतो ते नेहमी वाईटच असते. सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातही कोरोनाला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. मात्र व्यसनाधीन पणा किती जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण यवतमाळ मधून पुढे आले आहे. यवतमाळ मधील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं चक्क … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकने घेतली पोलीस ठाण्यातच फाशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यवतमाळ जिल्हयात एका साहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच फाशी घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले साहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके यांनी काल रात्री उशिरा फाशी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री १ वाजेपर्यंत ते कामावर होते. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या कक्षात बसून होते. … Read more