ताजिकिस्तानने अशरफ घनीच्या विमानाला उतरू दिले नाही, आता अमेरिकेत जाऊ शकतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आल्यानंतर सर्वत्र अराजकाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी तालिबान्यांनी काबूल आणि राष्ट्रपती भवन काबीज केले. यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. अशरफ घनी ताजिकिस्तानला पळून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र आता ताजिकिस्तानने अशरफ घनी यांचे विमान उतरू दिले नाही असे वृत्त आले आहे. अशा परिस्थितीत आता घनी अमेरिकेत जाऊ शकतात. ते सध्या ओमानमध्ये आहेत.

इंडिया टुडेने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) मोहिब हे अशरफ घनी यांच्यासोबत ओमानमध्येच आहेत. दोघेही विमानाने ताजिकिस्तानला एकत्रच पोहोचले, पण त्यांच्या विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली नाही.

देशाला रक्तपातापासून वाचवण्यासाठी मी पळालो – घनी
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी आपला देश सोडण्याचे कारण स्पष्ट करून रात्री उशिरा फेसबुक पोस्ट केली. त्यांनी लिहिले आहे की, ते अफगाणिस्तानातून पळून गेले जेणेकरून लोकांना आणखी रक्तपात पहावा लागू नये. घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जर ते अफगाणिस्तानमध्ये राहिले असते तर मोठ्या संख्येने लोकं देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोकं तिथे मरण पावले असते. यामुळे काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते.”

तालिबान जिंकला आहे
त्यांनी लिहिले की,” तालिबान आता जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे.” अशरफ घनी यांनी लिहिले आहे की, तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जाणार आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल किंवा तो इतर ठिकाणांना आणि नेटवर्कला प्राधान्य देईल.

माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्ला अब्दुल्ला अजूनही काबूलमध्येच आहेत
दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्ला अब्दुल्ला अजूनही काबूलमध्येच आहेत. दोघेही आज तालिबान नेतृत्वाशी बोलणी करणार आहेत. दोघेही प्रयत्न करत आहेत की, काहीही करून चर्चा यशस्वी झाली पाहिजे आणि काबूलमध्ये युतीचे सरकार आले पाहिजे, जेणेकरून लोकांना कमीत कमी त्रास होईल. मात्र काबूलची सत्ता थेट त्यांच्या हातात असल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आता सर्व काही तालिबानवरच अवलंबून आहे.

Leave a Comment