छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या कुबेरांवर कारवाई करा ; साताऱ्यात श्रीमंत कोकाटे यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव आज सातासमुद्रपार केला जातोय. मात्र, एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या RENAISSANCE STATE पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अक्षेपार्ह लिखाण केल्याने या विरोधात इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मंगळवारी सातारा येथे पत्रकार परिषद घेतली. तसेच लेखक गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या पुस्तकावर राज्य शासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सातारा येथे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या RENAISSANCE STATE पुस्तकातील अक्षेपार्ह लिखाणाबद्दल माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले, ” लेखक गिरीश कुबेर यांनी RENAISSANCE STATE हे पुस्तक लिहले आहे. त्या पुस्तकात त्यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्याकडे दूरदृष्टी नव्हती, राजाराम महाराज दर्जाहीन होते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कडेही दूरदृष्टी नव्हती आणि संभाजीराजे यांनी सोयराबाई यांची हत्या केली अशा पद्धतीची निराधार विधाने केलेली आहेत.”

कुबेर यांनी लिहलेले हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी सोयराबाई आणि छत्रपती शाहु महाराज यांची निंदानालस्ती व बदनामी करणारे पुस्तक आहे. या पुस्तकावर व लेखक गिरीश कुबेर यांच्यावर तत्काळ राज्य सरकारने कारवाई करावी. लेखक कुबेर यांनी पुस्तकातून केलेली मांडणी हि जातीवादी आणि पक्षपाती, दर्जाहीन अशी आहे. कुबेर यांनी इतिहासातील अनेक महापुरुषांची बदनामी केलेली आहे. त्यामुळे या पुस्तकावर राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे. आणि राज्य सरकार कारवाई करत नसेल तर लोकशाही मार्गाने आम्ही कुबेर यांना धडा शिकवू, असा इशारा इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.