पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घ्या! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनंही प्रतिष्ठित केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती लागला. यात भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत. मात्र या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापरण्यात आला आहे. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करून फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने केली आहे. नुकताच त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लिगल सेलचे ऍ. नितीन माने यांनी याबाबत मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या लीगल सेलना एक पत्र पाठवले आहे या पत्रात काही ठळक मुद्दे मांडण्यात आले आहेत. या पत्रातील आशय खालील प्रमाणे :

राष्ट्रवादीने पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवलं होतं. तसंच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा अन्यथा कामावरून काढून टाकू असंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे धमक्या देण्याचा संशय निर्माण होत असून त्या संदर्भातील काही मागण्या अशा आशयाने खालील मागण्या केल्या आहेत

– प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोघांच्या कारखान्याच्या तसेच कार्यालयाचे आणि घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे.
– दोघांचे फोन रेकॉर्डिंग तपासावेत.
– समाधान अवताडे यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा पूर्ण ऑडिटचा तपास करण्यात यावा.
– निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही सदस्यांच्या प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व संस्था कारखान्यातील आणि कन्स्ट्रक्शन कंपनी च्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.
– न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी.
– समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी.

याबाबत मुख्य निवडणूक आयोगासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment