भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दागिने खरेदी करताना सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. भारतातील स्त्रियांना सोन्याचे खूप जास्त आकर्षण आहे. सोन्याच्या दागिने छान दिसतात आणि सोन्याच्या दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. भारतामध्ये कोणतेही लग्नकार्य असो किंवा समारंभ असो. यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते.
सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठलेला आहे. सोन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा दर वाढलेला आहे. तरी देखील सोने खरेदी करण्याचा ट्रेंड मात्र गेलेला नाही. अनेकजण सोने खरेदी करताना दिसत आहेत. परंतु जेव्हा आपण सोने खरेदी करतो तेव्हा काही दृष्टिकोनातून आपली फसवणूक होण्याची देखील शक्यता आहे. आपण सोन्यामध्ये खूप जास्त पैसे गुंतवणूक करतो. त्यामुळे सोने खरेदी करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आता सोने खरेदी करताना फसवणूक होऊ नये. यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सोने खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या
हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच खरेदी करा
जेव्हा आपण सोने खरेदी करायला जातो. तेव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करणे. बऱ्याच वेळा आपल्याला दागिने आवडतात आणि त्या डिझाईनच्या नादामध्ये आपण त्याचे हॉलमार्क पाहत नाही. बीआयएस हॉलमार्क दागिने शुद्ध असण्याची ओळख आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही याची नक्की चौकशी करा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
सोन्याचे वजन तपासा
सोन्याची खरेदी करत असताना तुम्हाला ज्या वजनाचे सोने खरेदी करायचे आहे. त्या वजनाचे दागिने आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. सध्या सोने प्रचंड महागले आहे. त्यामुळे सोन्याच्या वजनामध्ये थोडा जरी चढ उतार झाला, तरी तुमचा आर्थिक दृष्टिकोनातून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी करताना त्याचे वजन तपासणे खूप गरजेचे आहे.
सोन्याची शुद्धता तपासणी
सोने खरेदी करताना सोन्याची शुद्ध तपासणी खूप गरजेचे आहे. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. परंतु सामान्यपणे सोन्याचे दागिने हे 18 ते 22 कॅरेटमध्ये बनवलेले असतात. यामध्ये इतर काही धातूंचे देखील मिश्रण असते. 24 कॅरेट सोन्यापासून दागिने न बनवता सोन्याची नाणी बनवली जातात. 24 कॅरेटचे सोने बनवले तर ते तुटायला अत्यंत पातळ असते त्यामुळे 22 कॅरेटचे दागिने बनवले जातात आणि त्यात इतर धातू असतात जेणेकरून दागिन्यांना कठीणपणा प्राप्त होतो.
सोने खरेदीची पावती घ्यावी
सोने खरेदी करताना केल्यानंतर सोनाराकडून बिल घ्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे बिलावर मेकिंग चार्जेस जीएसटी या संबंधीची माहिती आहे की नाही? याची देखील खात्री करून घ्या. त्यामुळे नंतर सोने खरेदी केल्याचा पुरावा तुमच्याकडे कायम राहतो. आणि सोने कोणाकडून खरेदी केले आहे? किती तारखेला खरेदी केली आहे? याची देखील माहिती मिळते.
दागिने तयार करण्यासाठी लागणारे चार्जेस तपासा
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्जेस सह इतर काही चार्जेस लावले जातात. त्यामुळे सोने खरेदी करताना मेकिंग चार्जेस तपासणे खूप गरजेचे आहे. मेकिंग चार्जेसचा भाग हा 30 टक्के असतो. आणि सोनारांना त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे सोने खरेदी करताना मेकिंग चार्जेस तपासणे खूप गरजेचे आहे.