हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank : सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. या बँकेचे नाव आहे इंडियन बँक. आता इंडियन बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. बँकेने एक निवेदन देताना म्हटले की,”रविवारपासून त्यांनी आपला मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे.”
Indian Bank कडून एक वर्षाचा बेंचमार्क MCLR 7.40 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, बहुटेक कंझ्युमर लोनचे व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात. बँकेच्या नियामक फाइलिंगमध्ये बँकेने म्हटले आहे की,”बँकेकडून एक दिवस ते सहा महिन्यांच्या कर्जावर MCLR समान प्रमाणात 6.75 वरून 7.40 टक्के वाढवला गेला आहे.”
आता EMI देखील वाढेल
MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घ्या कि, बहुतेक ग्राहक कर्जे ही लोन मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन देखील महागतील. Indian Bank
MCLR म्हणजे काय ???
हे लक्षात घ्या कि, MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँका कर्जासाठीचे व्याजदर ठरवतात. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशात MCLR लाँच केला. त्यापूर्वी सर्व बँकाकडून बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित केले जात असत. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता बँकांद्वारे MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर देखील परिणाम करते. Indian Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indianbank.in/lending-rates/
हे पण वाचा :
Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!
ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ
James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले बळींचे शतक !!!
Income Tax : आजपासून लागू झाले ‘हे’ मोठे आर्थिक बदल
Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत