LPG कनेक्शन घेणे आता झाले अधिक सोपे, आपल्याला द्यावा लागेल फक्त एक मिस्ड कॉल; त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Cashback Offers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला डिस्‍ट्रीब्‍यूटरच्या ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. आता जर तुम्हाला LPG कनेक्शन घ्यायचे असेल तर फक्त एक मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला सहजपणे LPG चे कनेक्शन मिळेल.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्वीट केले की,” आता जर कोणी 8454955555 कनेक्शनवर मिस्ड कॉल केला तर कंपनी त्याच्याशी स्वतः संपर्क साधेल. यानंतर, ऍड्रेस प्रूफ आणि आधार द्वारे गॅस कनेक्शन उपलब्ध होईल.

जुने कनेक्शन ऍड्रेस प्रूफ म्हणून मानले जाईल
IOCL ने सांगितले की, LPG रिफिल देखील या क्रमांकाद्वारे करता येते. यासाठी तुम्हाला फक्त रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून कॉल करावा लागेल. तुमच्या कुटुंबातील कोणालाही कोणत्याही कंपनीचे गॅस कनेक्शन असल्यास तुम्ही त्याच पत्त्यावर कनेक्शन मिळवू शकता असेही सांगितले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी असलेले गॅस कनेक्शन पत्त्याचा पुरावा म्हणून मानले जाईल. यासाठी तुम्हाला एजन्सीमध्ये जाऊन जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे दाखवून तुमचा पत्ता व्हेरिफाय करावा लागेल. यानंतर तुम्हाला त्याच पत्त्यावर गॅस कनेक्शन देखील मिळेल.

देशात ही सुविधा कुठे उपलब्ध असेल?
गेल्या महिन्यात, IOCL च्या चेअरमॅननी मिस्ड देऊन सिलेंडरमध्ये रिफिल करण्याची आणि नवीन LPG कनेक्शन मिळवण्याची सुविधा सुरू केली. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. यासह, IOC ने दरवाजावरच एक-सिलेंडर योजनेला दोन-सिलेंडर योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील सुरू केली होती. या योजनेत, जर ग्राहकाला 14.2 किलोचा दुसरा सिलेंडर घ्यायचा नसेल तर तो फक्त 5 किलोचा दुसरा सिलेंडर घेऊ शकतो. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने निवडक शहरांमध्ये मिस कॉलवर नवीन कनेक्शन देण्याची किंवा सिलेंडर भरण्याची सुविधा सुरू केली. आता देशभरातील ग्राहकांसाठी ही सर्व्हिस सुरू झाली आहे.

LPG सिलेंडर कसे बुक करावे
1. तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून 8454955555 ला मिस्ड कॉल द्या.
2. एलपीजी सिलिंडर भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे पुन्हा भरता येतात.
3. इंडियन ऑइलच्या अ‍ॅप किंवा https://cx.indianoil.in द्वारेही बुकिंग केले जाते.
4. ग्राहक 758888882424 वर WhatsApp मेसेजद्वारे सिलेंडर भरू शकतात.
5. याशिवाय 7718955555 वर SMS किंवा IVRS द्वारे देखील बुकिंग करता येईल.
6. Amazon आणि Paytm द्वारेही सिलेंडर भरता येईल.