महिलेला कॉन्फरन्स कॉलवर घेवून मित्राला विनयभंगाची धमकी : खंडणीचा गुन्हा

0
293
Satara Police City
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | न्यायालयीन एका प्रकरणात जामिनासाठी मदत केल्याच्या सांगत वारंवार पैशांची मागणी करणे व न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत अटक केली. महेश शंकर लवंगारे (वय- 26, रा. दौलतनगर, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार राजरतन सोरटे (वय- 25, मूळ रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओमकार हा सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून कामाला होता. तेव्हा त्याची लवंगारे सोबत ओळख झाली. डिसेंबर 2022 मध्ये ओमकारवर एका प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. यामुळे न्यायालयात जामीन लागणार असल्याने त्यासाठी लवंगारेला सांगितले. त्याने त्याला मदत केली; परंतु नंतर संबंधित कामासाठी वकिलांची फी द्यायची असल्याचे सांगून त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली.

वकिलाच्या फीचे पैसे दिल्यानंतरही त्याने पुन्हा वेळोवेळी पैशांसाठी तगादा लावला. पैसे दिले नाही, तर जामीन रद्द होईल, अशी भीती दाखवली. कॉन्फरन्स कॉलद्वारे एका महिलेला फोन लाइनवर घेऊन विनयभंगाची धमकी दिली, असे ओमकार याने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लवंगारेला अटक केली.