अवैध दारूविक्री करणाऱ्यावर तलाठ्यांची कारवाई, दक्षता समितीचा दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | मिरज तालुक्यातल्या बेडग येथे गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास दक्षता समितीच्यावतीने कारवाई करण्यात आली. बेडगमध्ये सध्या कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढत आहेत. बाधितांचा आकडा हा जवळपास ४०० पर्यंत गेला असून दररोज २० ते ३० च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गावात दक्षता समितीने कारवाईचा बडगा उगारत अवैध दारूविक्री करणाऱ्या दादू गणपती आकळे यास पकडून कारवाई करण्यात आली.

बेडगमध्ये २० एप्रिल पासून ५ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु करण्यात आला होता. तरीही रुग्ण संख्येत वाढच होत आहे. आजपासून दक्षता समितीकडून कारवाई करण्यात येत असून विनामस्क फिरणार्‍या १० लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रात्री अवैध दारूविक्री करणाऱ्या दादू गणपती आकळे याला दक्षाता समितीने सापळा रचून अवैद्य दारू विक्री करताना पकडले. तलाठी, सरपंच व दक्षता समिती यांच्या मार्फत २ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पुढील कारवाईसाठी मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी तलाठी व दक्षता समितीचे सचिव प्रवीणकुमार जाधव, सरपंच रुपाली शिंदे, उमेश पाटील, संभाजीराजे पाटील , संदीप कोळी, वैभव कोरे, शशिकांत पवार, नंदकुमार शिंदे दिगंबर कोकाटे, संतोष पवार आदि उपस्थित होते.