व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडचे तलाठी सागर पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड | कराडात ऑनलाईन सातबारा उतार्‍यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी ऑफिस चर्चेत आले आहे. यापूर्वीही या तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडचे तलाठी सागर पाटील यांनी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांनी खरेदी केलेल्या सर्वे नंबर 348/3 या प्लॉटवर तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या ऑनलाइन सातबारा उतार्‍यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी तलाठी यांनी 40 हजार रुपयांची मागणी केली होती.

संबंधित मागणीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी ही केली होती. त्यानंतर संबंधित विभागाचे सातारा पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो.ना प्रशांत ताटे, विशाल खरात या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यानुसार कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.