तालिबान हा भारतीय शांततेसाठी धोकादायक – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यानी कब्जा केल्यानंतर भारताला धोका असल्याचे म्हंटल जात आहे. भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने तालिबान हा भारतीय शांततेसाठी धोकादायक असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, अफगाणिस्तानमधील जमिनीचा वापर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानवर युएन सेक्योरिटी काऊंसिल रिझॉल्युशन 2593 लागू करण्यात यावं, असं त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला म्हटलं आहे.

दरम्यान गुप्तचर विभागाला एक दाट शक्यता वाटत आहे की, इस्लामिक स्टेटशी निष्ठा राखणारे २५ भारतीयांचा एक गट अफगाणिस्तानातून भारतात येत आहे. त्यामुळे हा भारतासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सुरक्षेबाबत विधान केले आहे.