नवी दिल्ली । अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य असले तरी पण त्याचा देशाच्या क्रिकेटवर आणि त्या चालवणाऱ्या मंडळावर परिणाम होणार नाही. रविवारी तालिबान प्रतिनिधींनी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे सदस्य आणि बोर्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर अझीजुल्लाह फाजलीला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष करण्यात आले. तो यापूर्वी मंडळाचे अध्यक्ष होता. अझीझुल्लाहच्या हातात आता अफगाणिस्तान क्रिकेटची कमान असेल आणि भविष्यातील स्पर्धा आणि मालिकांबाबत तो लवकरच निर्णय घेईल.
या बैठकीत तालिबानने पुन्हा एकदा क्रिकेटला पाठिंबा देण्याच्या वचनाचा पुनरुच्चार केला. तालिबानचे म्हणणे आहे की,”जेव्हा त्यांनी अफगाणिस्तानमध्ये मागच्या वेळी देशाची सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांच्या देशाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत, या वेळी देखील या खेळाचे समर्थन त्यांच्या कडून सुरूच राहील.”
तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे सदस्य अनस हक्कानी आणि क्रिकेट खेळाडूंशी संवाद साधणाऱ्या टीमने बैठकीत या वचनाचा पुनरुच्चार केला. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, माजी मुख्य निवडकर्ता असदुल्लाह आणि नूर अली झाद्रान या बैठकीत सहभागी झाले होते.
तालिबानने क्रिकेट संघाला सहकार्याचे आश्वासन दिले
या बैठकीदरम्यान खेळाडूंनी अनस हक्कानी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आभार मानले आणि तालिबानकडून पाठिंब्याची अपेक्षा केली. तत्पूर्वी, तालिबानच्या राजकीय संघाचे सोहेल शाहीन यांनीही क्रिकेटपटूंना भेटून त्यांना आश्वासन दिले होते की,” तालिबान नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहील.” मग तो म्हणाला की,” मी सुद्धा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामना पाहण्याची वाट पाहत आहे.” अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेत 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान 3 एकदिवसीय सामने होणार आहेत.