चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या पनरुतीजवळ मणदिकुप्पम गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कबड्डी (Kabaddi) खेळाडूचा लाईव्ह मॅचदरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या सामन्यादरम्यान (Kabaddi) हि घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान नेमके काय घडले ?
मॅच (Kabaddi) सुरू असताना विमलराजच्या रेडची वेळ आली तेव्हा तो विरोधी गटात आपला दावा खेळायला गेला, तेव्हा विरोधी टीमच्या खेळाडूंनी विमलला घेरलं आणि पाडलं. एका खेळाडूचा पाय विमलच्या छातीवर पडला, पण त्याने आपले 2 पॉईंट्स घेतले. पॉईंट्स घेतल्यानंतर विमल जागचा उठलाच नाही. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिकडे डॉक्टरांनी विमलला मृत घोषित केलं.
Live मॅचमध्येच कबड्डी खेळाडूचा झाला मृत्यू pic.twitter.com/ePHJkzjeEo
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 30, 2022
विमलचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. विमलच्या मृत्यूनंतर परिसरामध्ये दु:खाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या सोशल मीडियावर विमल कबड्डी (Kabaddi) खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर