हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे देशात आणखी एकाच बळी गेला आहे. तामिळनाडूमधील मदुराईमध्ये बुधवारी सकाळी एका ५४ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. मदुराईमधील राजाजी हॉस्पिटलमध्ये या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. करोना व्हायरसमुळे तामिळनाडूत झालेला हा पहिला मृत्यू आहे. अशी माहिती तामिळनाडू राज्याचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली. मदुराईच्या नागरिकांच्या मृत्यूनंतर देशातील करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आतापर्यंत ११ पोहचला आहे.
मदुराईमधील मृत व्यक्तीला करोना बरोबर अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनचा आजार होता. आम्ही आमच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करुनही रुग्णाला वाचवू शकलो नाही असे विजयभास्कर यांनीं ट्विटरवर सांगितलं आहे. तामिळनाडूत करोना बाधितांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी आणखी सहा नवीन रुग्ण आढळून आले. यात तीन महिला रुग्णांचा समावेश आहे.तर इकडे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा ११२ वर गेला असून आतापर्यंत ४ जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५६२ वर पोहोचला आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?