नवी दिल्ली । तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-2 वरील एका बॉयलरमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. आतापर्यंत 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर एनएलसी लिग्नाइट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, न्यूवेली थर्मल प्लांटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्कू ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत स्थानिक प्रशासनाच्या वतीने मृतांचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. घटनास्थळी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत.
Tamil Nadu: Explosion at a boiler in stage -2 of the Neyveli lignite plant. 17 injured persons taken to NLC lignite hospital. Visuals from the spot. More details awaited. https://t.co/jtaOudE9P0 pic.twitter.com/FWKYNsePVO
— ANI (@ANI) July 1, 2020
आतापर्यंत स्थानिक प्रशासनाच्या वतीने अपघातातील मृतांचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या घटनास्थळी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत. दरम्यान, आतापर्यंत स्फोटाच्या कारणांबाबत समजलेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमींची आणि मृतांची संख्या वाढू शकते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.
दरम्यान, कंपनी 3940 मेगाव्हॅट वीज निर्माण करते. तसेच ज्या प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. त्यामध्ये 1470 मेगाव्हॅट वीज निर्माण केली जाते. या कंपनीमध्ये 15 हजार कंत्राटी कामगारांसह जवळपास 27 हजार कर्मचारी काम करत असतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”