आणखी एका राज्यानं लॉकडाउन ठेवला कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । महाराष्ट्रासोबत इतर राज्यांपाठोपाठ देशातील आणखी एका राज्यानं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू सरकारनं ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. करोनामुळे तामिळनाडूतील परिस्थितीही गंभीर आहे. आतापर्यँत तामिळनाडूत १ हजार ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तामिळनाडूतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्य सरकारने लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ११ एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी मोदींना केली होती.

दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं २१ दिवसांचं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत आहे. उद्या पंतप्रधान मोदी देशातील जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी मोदी देशव्यापी लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment