धक्कादायक ! तनिष्कच्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील बेगुसराय जिल्हा मुख्यालय स्थित लोहियानगर सहायक पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री अज्ञातांनी एका महिलेची गोळी घालून हत्या (shot dead) केली आहे. या गोळीबारात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हि तरुणी तनिष्कच्या शोरूममध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. मृत महिलेचं नाव नेहा देवी आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, यानंतर पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती आपल्या माहेरी राहत होती. येथील तनिष्कच्या ज्वेलरी शोरूममध्ये ती काम करीत होती.

तनिष्क शोरूममधून घरी परतत होती
घटनेच्या दिवशी तनिष्कच्या शोरूममध्ये ड्यूटी संपल्यानंतर ती स्कूटीने घरी परतत होती. यादरम्यान पनहास चौकात आधीच तयारीत असलेल्या गुन्हेगारांनी तिच्यावर फायरिंग (shot dead) केली. गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि तिला शहरातील खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कुटुंबाचा सांभाळ करीत होती नेहा
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवला. नेहावर कुटुंबाची जबाबदारी होती. आता तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या हत्येनंतर (shot dead) लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी छापेमारी सुरू केली असून लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

हे पण वाचा :
Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!

पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाने विवाहित महिलेला पळवून नेत तिच्यासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

IND vs SA: स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांनी एकत्र गायले ‘मां तुझे सलाम’ गाणे

EPFO मध्ये ई-नॉमिनेशन कसे करावे ते जाणून घ्या

Leave a Comment