तनुश्री दत्ता ने माझ्यावर बलात्कार केला होता, राखी सावंतचा खळबळजनक आरोप

1
71
Rakhi Sawant Tanushree Dutta Mee too
Rakhi Sawant Tanushree Dutta Mee too
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या मिटूची मोहिम जास्त गाजत आहे. यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर शूटिंग दरम्यान छेडछाड केल्याचा आरोप केला होता. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचा वाद थांबायचे नाव घेत नाहीये. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केले आरोप खोटे असल्याचे आयटम गर्ल राखी सावंतने म्हटले होते. राखीने तनुश्रीला ड्रग अॅडीक्ट म्हटले होते. त्यावर तनुश्री दत्ताने राखी सावंतवर १० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. यावर आज राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री दत्ता ही लेस्बियन असल्याचाही दावा तिने केला आहे. आता राखी सावंतने पलटवार करत तनुश्री दत्तावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

मुली काम मिळवण्यासाठी काहीही करतात
राखी सावंतने आज चक्क नववारी साडी नेसून पत्रकार परिषद घेतली. तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला असून त्याचे दोन साक्षीदार असल्याचे राखीने सांगितले आहे. या दोन्ही साक्षीदारांची नावे राखीने सांगितले नाही मात्र या साक्षीदारांना मी कोर्टासमोर हजर करेल असे तिने सांगितले. बॉलिवूडमधील लोकं कधीच बलात्कार करत नाही असे देखील तिने म्हटले आहे. मुली काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती करतेय बेटी बचाओ मोहिमेप्रमाणेच आता आदमी बचाओ मोहीमही सुरू करा” असं राखीने पत्रकार परिषदे दरम्यान म्हटले आहे.

#MeToo | Rakhi Sawant full Press Conference | Tanushree Dutta, Nana Patekar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here