हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या बिझनेस ग्रुपमध्ये TATA Group चे नाव आघाडीवर आहे. या ग्रुपने देशात अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. कमाईच्या बाबतीतही या ग्रुपमधील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी मोठ्या कमाईची दारे उघडली आहेत. TATA Group च्या एका कंपनीने तर अल्पावधीतच गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक रिटर्न मिळवून दिला आहे. ज्याचे नाव Trent Ltd असे आहे. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 2 दशकात मल्टीबॅगर स्टॉक बनण्याचा मान मिळवला आहे.
देशातील आघाडीचे ब्रोकरेज हाऊस असलेल्या मोतीलाल ओसवाल यांनी तर Trent Ltd च्या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिले आहे. यावेळी यासाठी 1500 रुपयांची टारगेट प्राइस देण्यात आली आहे. सध्या हे शेअर्स 1,320 रुपयांच्या पातळीवर आहेत. म्हणजेच, सध्याच्या किंमतीवर या स्टॉकमध्ये 10% रिटर्न देण्याची क्षमता आहे.
हा मल्टीबॅगर स्टॉक कोणत्या स्तरावर खरेदी करायचा?
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (रिसर्च) असलेले अनुज गुप्ता म्हणाले कि,” ट्रेंटचे शेअर्स प्रत्येक घसरणीवर खरेदी केले जाऊ शकतात. या शेअर्सचा स्ट्रॉंग सपोर्ट 1270 ते 1240 रुपयांवर आहे, त्यामुळे जर तो 1300 रुपयांच्या खाली गेला तर यामध्ये खरेदीची चांगली संधी आहे. त्याच वेळी, हे शेअर्स वरच्या स्तरावर 1380 रुपयांवर रेझिस्टन्सला तोंड देत आहे. जर या शेअर्सने ही पातळी तोडली तर त्याची किंमत 1440 ते 1470 रुपयांवर येऊ शकते. TATA Group
गेल्या 20 वर्षात दिला 13000% चा जबरदस्त रिटर्न
इथे हे लक्षात घ्या कि, Trent Ltd च्या शेअर्सची गेल्या एका वर्षांत 20% पेक्षा जास्त तर गेल्या 2 वर्षांत 50% पर्यंत रिटर्न दिला आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 1571 रुपये तर गेल्या 52 आठवड्यांचा निच्चांक 983 रुपये आहे. 2003 मध्ये 15 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 1,320 रुपयांच्या पातळीवर आहेत. 2014 पासून यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. गेल्या 20 वर्षात या शेअर्सने 13000% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. TATA Group
कंपनीबाबत जाणून घ्या
Trent Ltd ही रिटेल क्षेत्रातील एक सक्रिय कंपनी आहे, जिचे संपूर्ण भारतात मिळून अनेक रिटेल स्टोअर्स आहेत. 1952 मध्ये स्थापना झालेली ही कंपनी कपडे, फुटवेअर, उपकरणे इत्यादींच्या किरकोळ विक्री आणि व्यापारात गुंतलेली कंपनी आहे. TATA Group
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/trent-ltd/trent/500251/
हे पण वाचा :
फोनचा Charger सॉकेटमध्ये तसाच ठेवल्याने वीज खर्च होते का ???
होळीला रंग खेळताना Smartphone पाण्यात पडला तर तातडीने करा ‘हे’ काम
Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Smartphone वापरताना कधीही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Multibagger Stock : ‘या’ 5 शेअर्सनी गेल्या 1 वर्षात जोरदार रिटर्न देत गुंतवणूकदारांना केले मालामाल