हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मनसोक्तपणे हाय स्पीड इंटरनेटचा वापर करण्यासाठी आणि OTT कन्टेन्टचा आनंद घेण्यासाठी अनेक जणांचा कल ब्रॉडबँड आणि फायबर कनेक्शनकडे वळत आहे. त्यामुळे इंटरनेट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन्स घेऊन येत आहेत आणि ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टाटा प्ले फायबर सुद्धा आपल्या यूजर्ससाठी जबरदस्त प्लॅन्स ऑफर करत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला हवा तो प्लॅन मिळतोय. त्यातही जर तुम्ही स्वस्तात मस्त आणि परवडेल अशा प्लॅनच्या शोधात असाल तर टाटा प्लेकडे एक खास पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला 50Mbps स्पीड आणि 3300GB डेटा मिळतो. यासोबत Disney Hotstar, Sony Liv, Boot Select आणि G5 सारख्या लोकप्रिय OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन सुद्धा उपलब्ध असेल.
टाटा प्ले फायबरच्या या प्लॅनचा कालावधी 6 महिने किंवा 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह येतो. जर तुम्हाला 6 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनचा प्लॅन घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 5100 रुपये मोजावे लागतील. त्याचवेळी जर तुम्हाला 12 महिन्यांचा सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला 9600 रुपये खर्च करावे लागतील. मासिक सबस्क्रिप्शन घेतल्यावर, तुम्हाला इन्स्टॉलेशन चार्ज भरावा लागेल तर लॉन्ग टर्म सब्सक्रिप्शन घेतल्यास मात्र तुम्हाला इन्स्टॉलेशन चार्ज भरावा लागणार नाही.
टाटा प्ले फायबरच्या या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेटचा वापर करण्यासाठी 3300 GB (3.3TB) डेटा मिळेल. याचे स्पीड 50Mbps इतके असेल. टाटाच्या या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला OTT फायदेही मिळणार आहेत. यामध्ये Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 Ut Select Lionsgate Play आणि Eros Now यासोबत अनेक अँप्सचाही समावेश आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला परवडणाऱ्या अशा फायबर प्लॅनच्या शोधात असेल तर टाटाच्या या प्लॅनचा विचार नक्की करू शकता.