Tata Tiago EV : टाटा मोटर्सने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; पहा किंमत आणि फीचर्स

Tata Tiago EV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Tata Tiago EV) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर Tata Motors ने आपली लोकप्रिय हॅचबॅक कार Tata Tiago इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यानुसार ही इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनली आहे. या गाडीच्या लॉन्चिंग नंतर टाटा कडे आता SUV, सेडान आणि हॅचबॅक अशा तिन्ही प्रकारातील इलेक्ट्रिक कार मॉडेल्स आहेत. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीची खास वैशिष्ट्ये …

2 बॅटरी पॅक- (Tata Tiago EV)

Tiago EV दोन बॅटरी पर्यायांसह ऑफर केली जात आहे – एक 19.2 kWh युनिट आणि दुसरी म्हणजे 24 kWh युनिट. यामधील 24kWh बॅटरी पॅक एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 315 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तर दुसरीकडे, 19.2 kWh बॅटरी पॅक पर्याय एका चार्जवर 250 किमी पर्यंत धावू शकतो. कंपनीने त्यात टिगोर EV सारखीच इलेक्ट्रिक मोटर आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह सेटअप दिला आहे.

Tata Tiago EV

5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग-

Tata Tiago EV फास्ट चार्जिंग पर्यायाला सपोर्ट करते. DC फास्ट चार्जर वापरून, बॅटरी 57 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. Tiago EV कंपनीच्या Ziptron हाय -व्होल्टेज आर्किटेक्चरवर आधारित आहे. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. यात दोन ड्राइव्ह मोड आहेत. या इलेक्ट्रिक कार (Tata Tiago EV) मध्ये ऑटोमॅटिक हवामान नियंत्रण, पाऊस-सेन्सिंग वाइपर, क्रूझ कंट्रोल, 8-स्पीकर हरमन साउंड सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि बारिश वैशिष्ट्ये आहेत.

Tata Tiago EV

किंमत –

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, वेगवेगळ्या व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळ्या किमती आहेत. त्यानुसार ,

टाटा Tiago EV (XE वेरिएंट, 19.2kWh बैटरी)- 8.49 लाख रुपये

टाटा Tiago EV (XT वेरिएंट, 19.2kWh बैटरी)- 9.09 लाख रुपये

टाटा Tiago EV (XT वेरिएंट, 24kWh बैटरी)- 9.99 लाख रुपये

टाटा Tiago EV (XZ+ वेरिएंट, 24kWh बैटरी)- 10.79 लाख रुपये

टाटा Tiago EV (XZ+ टेक लग्जरी वेरिएंट, 24kWh बैटरी)- 11.29 लाख रुपये

टाटा Tiago EV (XZ+ वेरिएंट, 24kWh बैटरी)- 11.29 लाख रुपये

टाटा Tiago EV (XZ+ टेक लग्जरी वेरिएंट, 24kWh बैटरी)- 11.79 लाख रुपये

हे पण वाचा :

Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

BMW i4 : एका चार्जमध्ये 590 किमी धावणार BMW ची इलेक्ट्रिक कार; किती आहे किंमत?

Audi A4 : नव्या अपडेटसह लॉन्च झाली Audi A4; पहा किंमत

Volvo XC40 Facelift : Volvo XC40 फेसलिफ्ट भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग