हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा- एअरबसवर सोपवण्यात आली आहे. गुजरातमध्ये टाटा आणि एअरबस संयुक्तपणे C295 वाहतूक विमान तयार करतील. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.
या प्रकल्पामुळे भारतातील खासगी कंपन्या संयुक्तपणे विमानांची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ असेल. करारानुसार, एअरबस पहिली 16 विमाने तयार स्थितीत स्पेनच्या असेंबली लाइनवरून भारतात पाठवेल. पुढील 4 वर्षांत ही 16 विमाने टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. उर्वरित ४० विमानांची निर्मिती टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स एअरबसच्या सहकार्याने करणार आहे.
PM Modi will lay the foundation stone of the C-295 transport aircraft manufacturing plant in Vadodara, Gujarat on October 30: Defence Ministry spokesperson https://t.co/70zmDCnETo
— ANI (@ANI) October 27, 2022
गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी स्पॅनिश कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत 56 सी-295 वाहतूक लष्करी विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता. करारावर स्वाक्षरी केल्यापासून ४८ महिन्यांच्या आत स्पॅनिश कंपनी भारताला ‘फ्लाइंग मोड’मध्ये 16 विमानांचा पुरवठा करेल, असा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. उर्वरित ४० विमाने भारतातील टाटा कन्सोर्टियमद्वारे तयार केली जातील.