हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस आयफोनची क्रेझ वाढत चालली आहे. आयफोनमध्ये देण्यात आलेल्या फॅसिलिटीज आणि त्यामधील फीचर्स पाहता तरूण वर्गात आयफोन घेण्याबाबत जास्त उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे आता टाटा कंपनीने भारतातच आयफोन बनवण्याची योजना आखली आहे. या योजनेमुळे देशातील सुमारे 28 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
सध्या भारतामध्ये टाटा कंपनीला आयफोन निर्मितीचा वेग वाढवायचा आहे. त्यामुळे टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडला 125 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले आहे. विशेष बाब म्हणजे, टाटा आयफोन 28,000 बेरोजगारांना नोकरी देण्यात येईल. कारण या युनिटसाठी कंपनी 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यानुसार, कंपनी दीड वर्षात 25 ते 28 हजार लोकांना नोकरी देईल.
समोर आलेल्या माहितीनुसार, विस्ट्रॉन आयफोन निर्मितीच्या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे टाटा कंपनीचे थेट विस्ट्रॉनच्या मालकीचा कारखाना विकत घेतला आहे. या कारखान्यात कंपनी आयफोनचे उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेसाठी भारतातच आयफोनचे उत्पादन करण्यात येईल. या नव्या प्रकल्पासाठी टाटा कंपनीला मनुष्य संख्या बळाची ही गरज भासेल. यामुळे कंपनी 25 हजारपेक्षा जास्त लोकांना नोकरीची संधी देईल.