हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :एकीकडे देश करोना संकटासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे Tauktae वादळ केरळ किनारपट्टी पोहचले आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम विमान सेवेवर देखील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ‘अरबी समुद्रावर प्रतिकूल हवामान तयार झाल्यामुळे चेन्नई, तिरुअनंतपुरम, कोची, बेंगळुरू, मुंबई, पुणे, गोवा आणि अहमदाबाद येथील १७ मे, २०२१ पर्यंत विमानांवर परिणाम होण्याची शक्यता आहे’. अशी माहिती देण्यात आली आहे.
Due to the adverse weather conditions expected over Arabian Sea, flights to and from Chennai, Thiruvananthapuram, Kochi, Bengaluru, Mumbai, Pune, Goa, and Ahmedabad are likely to be impacted till 17th May, 2021: Vistara
— ANI (@ANI) May 15, 2021
चक्रीवादळ गुजरात कडे सरकणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे भुवनेश्वर येथून NDRF ची टीम आपल्या आवश्यक साहित्यासह गुजरातच्या विमानतळाकडे रवाना झाली आहे. आपत्कालीन मदत कार्यांसाठी तिसर्या बंडल मुंडुली, भुवनेश्वर येथून 5 एनडीआरएफची टीम गुजरातकडे रवाना झाली आहे.
Odisha: 5 NDRF team from 3rd battalion Munduli, Bhubaneswar proceeding to Gujarat for any emergency relief works in wake of Cyclone Tauktae. Visuals from Bhubaneswar Airport. pic.twitter.com/bcSOv8WsFn
— ANI (@ANI) May 15, 2021
सध्या अरबी समुद्रात हे चक्रीवादळ लक्षदीप येथे घोंघावत आहे आणि दक्षिणपूर्व अरबी समुद्राच्या परिसरात हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे चक्रीवादळ तयार झाल्यास या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे पण तसं असलं तरी गुजरातला मात्र याचा मोठा फटका बसू शकतो असं हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आला आहे
Kerala: Heavy rain continues in several parts of the state, visuals from Malappuram district. Red Alert today in the district. pic.twitter.com/wPdEYL70ek
— ANI (@ANI) May 15, 2021
महाराष्ट्रावरही परिणाम
महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या किनारपट्टी असलेल्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो यात प्रामुख्याने मुंबई ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही मात्र तरीही मुंबईत काळजी घेतली जाते मुंबईत पावसाची शक्यता आहे त्यामुळे कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे शहरातील अनेक भागात सकाळीच पावसाच्या हलक्या सरी पडल्यात या वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय कामाच्या शिवाय बाहेर न पडण्याचा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा जोरदार वार वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून सुद्धा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे या चक्रीवादळात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन पूर्वतयारी करण्यासाठी NDRF टीम तैनात करण्यात आले आहे. त्यापैकी गोव्यात 23 सिंधुदुर्ग दोन टीम, रत्नागिरी गुजरात मध्ये राहणार आहेत.