दोन महिन्यात तीसरी घटना : बेडगमध्ये जैव वैद्यकीय कचरा व पी.पी.ई. किट उघड्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | मिरज तालुक्यातील बेडग येथे जैव वैद्यकीय कचरा व पीपीई किट बेडग-नरवाड रस्त्यालगत उघड्यावर टाकले आहे. बेडग स्मशानभूमी रोड लगत ओढ्याजवळ काही अंतरावर वापरलेले पीपीई किट उघड्यावर टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. तर स्मशानभूमी जवळच नरवाड रोडच्या बाजूस जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. या पासून रोगराई होण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यातील बेडग मधील हि तिसरी घटना आहे.

फेब्रुवारी महिन्यांमध्ये बेडग – मिरज रस्त्यावर अशाच प्रकारे वैद्यकीय कचरा टाकण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी बेडग स्मशानभूमी नजीक नरवाड रस्त्यावर मागील इंजेक्शन्स, सुया, सलाईन साठी वापरण्यात आलेल्या बाटल्या ,पाईप , ड्रेसिंग केलेले बँडेज आणि इतर वैद्यकीय कचरा टाकण्यात आला होता. तर आज पीपीई किट उघड्यावर टाकण्यात आले आहे.

या कचऱ्यापासून गवत चरणाऱ्या जनावरांना ही व इतर संसर्ग रोगाचा धोका होऊ शकतो. यासाठी जैव वैद्यकीय कचरा मानवी वस्तीत न टाकता त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही खाजगी संस्था कार्यरत आहेत. पण निष्काळजीपणे काही लोकांचा असा प्रकार इतरांचा जीवघेणा ठरेल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमठत आहेत.

Leave a Comment