हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक (Team India Coach) राहुल द्रविड यांचा कार्यकाळ येत्या T20 वर्ल्ड कप नंतर संपणार आहे. अशावेळी मग टीम इंडियाचा नवा कोच कोण असणारा यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. 27 मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय संघाचा जो कोणी नवा प्रशिक्षक असेल त्याचा कार्यकाळ जुलै 2024 ते डिसेंबर 2027 पर्यंत असेल. तसेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मध्ये त्याला आपलं योगदान द्यावं लागेल.
एका रिपोर्ट्स नुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर,व्हीव्हीएस लक्ष्मण, महेला जयवर्धने यांच्या नावांचा विचार करत आहे. हे संभाव्य उमेदवार भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यास इच्छुक आहेत का ते जाणून घेण्याचा प्रयत्न बीसीसीआय करत आहे. प्रशिक्षक पदाच्या संभाव्य यादीत भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराचे नाव सुद्धा होते मात्र सर्व फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ प्रशिक्षण देण्याबाबत थोडी शंका आहे.
भारताच्या नव्या कोचला 2027 मध्ये होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत आणि दरवर्षी कमीत कमी १० महिने टीम इंडियासोबत राहावं लागणार आहे. वरील जी काही संभाव्य नावे आहेत ते खेळाडू सध्या आयपीएल मधील कोणत्या ना कोणत्या संघाचे प्रशिक्षक आहेत त्यामुळे त्यांना अनुभव आहे.. व्हीव्हीएस लक्ष्मण हा एकमेव असा व्यक्ती आहे जो सध्या आयपीएलमध्ये कोचिंग करत नाही. लक्ष्मण सध्या एनसीए प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
सूत्रांच्या मते, टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षक पदाच्या यादीत गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर आहे. आयपीएल मध्ये गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने फायनल मध्ये धडक मारल्याने गंभीरची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. तसेच गंभीर आणि भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये चांगली मैत्री सुद्धा आहे. भारताचा मुख्य खेळाडू विराट कोहली गंभीरमध्ये काही मतभेद असल्याच्या चर्चा असतात मात्र मैदानाबाहेर दोघांमध्ये नेहमीच चांगली मैत्री राहिली आहे. या एकूण सर्व कारणामुळे गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याचे चान्सेस जास्त आहेत.