हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. युवा सलामीवीर शुभमन गिल कडे भारतीय संघाचे कर्णधापद सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्माने तडकाफडकी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर नवा कर्णधार कोण असेल याबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. अखेर आज शुभमन गिलच्या नावावर शिक्कमोर्तब झालं. गिल हा भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिली कसोटी २० जूनपासून लीड्समध्ये खेळवली जाईल. तर दुसरी कसोटी २ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवली जाईल. तिसरी कसोटी १० जुलैपासून लॉर्ड्सवर, तर चौथी कसोटी २३ जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवली जाईल. पाचवी आणि शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाईल.
कोण कोण नवीन चेहरे?
भारतीय संघात ६ मुख्य फलंदाज, २ यष्टीरक्षक फलंदाज, २ फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू, २ वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आणि ५ मुख्य जलद गोलंदाज आणि एक स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तडाखेबंद फलंदाजी करणारा आणि ऑरेंज कॅपचा मानकरी साई सुदर्शनला टीम इंडियात स्थान मिळालं आहे. तर डाव्या हाताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगलाही कसोटी संघात एंट्री देण्यात आली आहे. याशिवाय, भारतीय-अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनलाही संधी देण्यात आली आहे. करुण नायर आठ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. शार्दुल ठाकूरनेही संघात पुनरागमन केलं आहे.
असा आहे भारतीय संघ :
इंग्लैंड दौरे के लिए भारतीय टीम: शुभमन गिल (कप्तान), ऋषभ पंत (विकेटकीपर/उपकप्तान), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव




