Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Technology : बऱ्याचदा आपल्या कॉम्प्युटरमधील एखादी फाइल चुकून डिलीट होते. अशातच जर ती महत्वाची फाईल असेल चिडचिड होणे साहजिकच आहे. अशा फाइल्स रिकव्हर करण्यासाठी बराच वेळ वाया जातो. तसेच काहीवेळा अशा फाइल्स रिकव्हर देखील करता येत नाही. हे जाणून घ्या कि, कॉम्प्युटरमधील फाइल्स रिकव्हर करण्यासाठीचे मुख्यतः तीन मार्ग वापरले जातात. यातील पहिला म्हणजे रिसायकलिंग बिनद्वारे. दुसरा बॅकअपद्वारे आणि तिसरा थर्ड पार्टी सॉफ्टवेअर प्रोग्रॅमद्वारे. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

How to Recover Deleted Files from Laptop/PC on Windows 10 - EaseUS

रिसायकलिंग बिनद्वारे फाइल्स कसे रिस्टोअर करावे???

रीसायकल बिनमधून फाइल्स रिस्टोअर करणे खूप सोपे आहे. याद्वारे फाइल्स अगदी सहजपणे रिस्टोअर करता येतात. यासाठी सर्वांत आधी रिसायकल बिन उघडा. त्यानंतर ज्या फाइल्स रिस्टोअर करायच्या आहेत त्यावर राईट क्लिक करा. यानंतर तीन किंवा चार पर्याय दिसतील. पहिला पर्याय ‘Restore’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर फाइल्स जिथून डिलीट झाल्या होत्या तिथे दिसून येतील. Technology

7 Ways to Recover Deleted Files from Your Computer - wikiHow

बॅकअपद्वारे फाइल्स कसे रिस्टोअर करावे???

बॅकअप हा एक चांगला पर्याय ठरेल. कॉम्प्युटर वापरणाऱ्याने नेहमीच आपल्या कॉम्प्युटर फाइल्सचा बॅकअप ठेवायला हवा. असे केल्याने जर कधी फाईल्स चुकून डिलीट झाल्या तर बॅकअपद्वारे त्या सहजपणे रिस्टोअर करता येतील. तसेच जर कधी कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम करप्‍ट झाली तर नवीन OS इंस्‍टॉल करून बॅकअपद्वारे फाइल्स परत मिळवता येतील. Technology

3 Parts| Recover Permanently Deleted Files Without Software in Windows  10/8/7 & Mac - EaseUS

थर्ड पार्टी सॉफ्टवेअर प्रोग्रॅमद्वारे फाइल्स रिस्टोअर कसे करायचे???

इंटरनेटवर डेटा रिकव्हर करणारे अनेक सॉफ्टवेअर्स फ्री मध्ये किंवा सबस्क्रिप्शनवर उपलब्ध आहेत. याद्वारे फाइल्स रिस्टोअर करता येतील. यामध्ये Is Us Data Recovery Wizard, Recuva, Mini Tool Partition Recovery, DMDE, Photorec, Disk Drill, Stellar Data Recovery, Mini Tool Power Data Recovery आणि Advanced Disk Recovery सारख्या सॉफ्टवेअर्सचा समावेश आहे. यापैकी कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून फाइल्स रिकव्हर करता येतील. या सर्व सॉफ्टवेअरचा इंटरफेसही अगदी सोपा आहे. Technology

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://download.cnet.com/EaseUS-Data-Recovery-Wizard-Free/

हे पण वाचा :

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!

Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा !!!

Train Cancelled : आजही रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे तपासा ट्रेनचे स्टेट्स

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, आजचे नवीन दर पहा