इस्रोकडून पहिल्यांदाच अंतराळात पाठवली जाणारी महिला रोबोट ‘व्योमित्र’ कोण आहे? तिला अंतराळात का पाठवले जाणार आहे? वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अंतराळात आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय अंतराळ एजन्सीने (इस्रोने) अंतराळात रोबोट पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मानव रहित वाहनात बसून अंतराळात पाठविलेल्या या रोबोटला ‘व्योमित्र’ असे म्हणतात. गगनयान मिशनमध्ये व्हायोमित्रची भूमिका काय आहे ते आपण पाहू या. वास्तविक, मानवांना अंतराळात पाठविण्यासाठी गगनयान मिशन डिसेंबर 2021 मध्ये इस्रोमार्फत सुरू केले जाईल. परंतु यापूर्वी, इस्रो,  सुरक्षा … Read more

Amazon घेऊन येत आहे पर्यावरणपूरक ई रिक्षा; संस्थापक जेफ बेझोस यांनी ट्विटरवरून दिली माहिती

ई-कॉमर्स कंपनी Amazone लवकरच इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा घेऊन भारतात येत आहे. Amazonचे जेफ बेझोस यांनी सोमवारी याबद्दल एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी झिरो कार्बन उत्सर्जनासह ई-रिक्षा भारतात आणणार असल्याचे म्हटले आहे. Amazon ही कंपनी सात वर्षांपूर्वी भारतात आली. येथे कंपनीने 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसे गुंतविले आहेत.

ISROने केलं GSAT-30 दुरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) जीसॅट-३० GSAT-30 या दूरसंचार उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.

तब्बल ५ महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये २-जी इंटरनेट सेवा बहाल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था व सद्यस्थितीची पडताळणी करून केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ७ दिवसांसाठी २-जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून केवळ पोस्टपेड ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. या संबंधीचा आदेश १५ जानेवारीपासून ७ दिवसांपर्यंत लागू असणार आहे. मात्र ही सुविधा केवळ ७ दिवसांसाठी दिली जात असताना या ७ दिवसांच्या पाहणीनंतर या सेवाचा कालवधी वाढवला जाऊ शकतो.

आता पाॅवरबँकची गरजचं राहणार नाही! सलग ५ तास मोबाईल चालवणारी बॅटरी विकसित

स्मार्टफोन युझर्सना नेहमी येणारी अडचण म्हणजे बॅटरी बॅकअप. हे युझर्स कुठंही गेले तर आधी चार्जिंगसाठी सॉकेट शोधातात नाहीतर भल्या मोठ्या वजनाची पावरबँक घेऊन हातात फिरताना दिसतात. तर काहींच्या बॅटरी चार्च करणं स्वभावात नसतं. मात्र, अशा मंडळींना दिलासा देणारा एक नवा शोध लागला आहे.

६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील … Read more

ट्रोलिंगपासून बचावासाठी ट्विटरचे नवीन फिचर; ट्विटर युजर्सना दिलासा,पहा काय आहे फिचर

टीम हॅलो महाराष्ट्र : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या फीचरद्वारे युजर्स त्यांच्या कोणत्याही पोस्टवर येणारा प्रतिसाद नियंत्रित करण्यास सक्षम असतील. म्हणजेच, आता आपण आपल्या पोस्टवर कोण प्रत्युत्तर देऊ शकेल हे आपल्याला ठरवता येईल. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युजर्स ट्रोलर्सवर नियंत्रण ठेवू शकतील. हे नवीन वैशिष्ट्य आणण्यापूर्वी कंपनी … Read more

जगातील पहिला कृत्रिम मानव ‘निऑन’ येत आहे आपल्या भेटीस

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच (एआय) याच्या पुढे काय ? असा सवाल नेहमीच उपस्थित होत असतो. मात्र त्याचे उत्तर आता मिळाले आहे. जगातील सर्वात पहिला ‘आर्टिफिशियल ह्युमन’ किंवा कृत्रिम मानव ज्याला ‘नियॉन’ असं नाव दिलं गेलं आहे याची निर्मिती करण्यात येत आहे. सॅमसंग समर्थित स्टार लॅब यासाठी प्रयन्त करीत आहे. स्टार लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले प्रणव मिस्त्री यांनी नियॉन हा कृत्रिम मानव सजीव माणसाप्रमाणे आपलाल्या वास्तविक अनुभव देऊ शकेल असे उद्दीष्ट समोर ठेवत याची निर्मिती करत असल्याचे सांगितलं आहे.

चंदीगडमधील शाळकरी मुलांचा खासगी डेटा विक्रीला; ४ ते ६रु.प्रति विद्यार्थी दर

र्तमान आधुनिक युगात ‘डेटा इज न्यू ऑइल’ असं म्हटलं जात. त्यामुळं आपली खासगी माहिती कुठेही शेयर करताना सजग नागरिक नेहमीच काळजी घेत असतात. मात्र, तांत्रिक युगात आपला खासगी डेटा काहीजण त्यांच्या फायद्यासाठी चोरल्या गेल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला येतात. चंढीगडमध्ये असाच एक खासगी डेटा चोरीचा प्रकार एका नामवंत वृत्तपत्राने उजेडात आणला आहे.

गुगल ही जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट; युट्युब दुसऱ्या तर फेसबुक तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : अल्फाबेट कंपनीचे सर्च इंजिन गुगल ही जगातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे. ऑक्टोबरमध्ये गुगलला 79.62 अब्ज व्हियुज मिळाले. सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने 24.60 अब्ज व्ह्यूजसह तिसरे स्थान पटकावले आहे. गुगलला फेसबुकच्या तीन पटहून अधिक व्हियुज मिळाले आहेत. दुसरे स्थान 28.85 अब्ज व्हियुज असलेली व्हिडिओ स्ट्रीमिंग साइट युट्युब आहे. या साइटला ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक व्हियुज … Read more